स्पोर्ट्स डेस्क- टीम इंडियासोबत वनडे आणि टी-20 सीरीज खेळण्यासाठी इंग्लंड टीम पुन्हा एकदा भारतात आली आहे. रविवारी दोन्ही टीमच्या खेळाडूंनी मुंबईतील ब्रेबोर्न स्टेडियमवर जोरदार घाम गाळला. या दरम्यान जेव्हा इंग्लिश टीमचे सर्व खेळाडू मैदानात घाम गाळत होते तेव्हा भारताचे मात्र केवळ दोन खेळाडूच मैदानात सराव करताना दिसले. युवराज-शिखर उतरले मैदानात...
- टीम इंडियाचे खेळाडू युवराज सिंग आणि शिखर धवन नेट प्रॅक्टिस करताना दिसले. दोघेही अनेक दिवसानंतर संघात परतले आहेत.
- शिखर धवन वर्षभरानंतर तर युवराज तीन वर्षानंतर संघात परतला आहे.
- या दोघांशिवाय इतर कोणताही इंडियन क्रिकेटर प्रॅक्टिस करताना दिसला नाही.
- दुसरीकडे, इंग्लंडच्या सर्व खेळाडूंनी घाम गाळला. कर्णधार इयान मोर्गनसह सर्वांनी प्रॅक्टिस केली. इयान मोर्गन कसोटी संघाचा भाग नव्हता.
- टेस्ट सीरीज संपताच इंग्लिश टीम ख्रिसमस आणि न्यू ईयर साजरा करण्यासाठी ब्रिटनमध्ये परतली होती.
- इंग्लंडची टीम मंगळवारी पहिली प्रॅक्टिस मॅच खेळेल. तर 12 जानेवारीला दुसरी प्रॅक्टिस मॅच होईल.
पुढे स्लाईडद्नारे पाहा, सराव सामन्याच्या आधी खेळाडूंनी मैदानात कसा गाळला घाम...