आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बटलरचे तुफानी शतक; इंग्लंडचा पाकला दणका, मालिका ३-१ ने जिंकली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई- यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरने (नाबाद ११६) अवघ्या ४६ चेंडूंत तुफानी फलंदाजी करताना शतक ठोकून इंग्लिश क्रिकेटमध्ये इतिहास रचला. त्याच्या या तुफानी शतकाच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानला चौथ्या एकदिवसीय सामन्यात ८४ धावांनी हरवले. बटलरने स्वत:चाच ६१ चेंडूंत वेगवान शतकाचा विक्रम मोडला. तो वेगवान शतक ठोकणारा जगातला सातवा फलंदाज ठरला. त्याच्या शतकामुळे डेब्यू सामन्यात जे. रॉयचे शतक फिके पडले. बटलर, रॉयच्या शतकाच्या बळावर इंग्लंडने ५ बाद ३५५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकला ४०.४ षटकांत २७१ धावांत गुंडाळून ८४ धावांनी मोठा विजय मिळवला. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली.

बटलरचे धावांचे तुफान
टॉस जिंकून इंग्लंडने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जे. रॉय आणि बटलरच्या शतकांच्या बळावर इंग्लंडने मैदानावर धावांचा पाऊस पाडला. रुटने ७१ चेंडंूत २ षटकार, ३ चौकार मारताना ही खेळी केली. जे. रॉयने ११७ चेंडूंचा सामना करताना १ षटकार, ८ चौकारांसह १०२ धावा ठोकल्या. ३५.३ षटकांत इंग्लंडच्या १९४ धावा झाल्या असताना रॉय बाद झाला. रॉय बाद झाल्यानंतर बटलर खेळण्यास आला. त्याने तुफानी फलंदाजी करीत धावांचा पाऊस पाडला. बटलरने ४६ चेंडूंत शतक आणि ५२ चेंडूंत नाबाद ११६ धावा ठोकल्या. यात खेळीत त्याने ८ षटकार आणि १० चौकार मारले.

बाबर, मलिकची अर्धशतके
विजयासाठी ३५६ धावांचा पाठलाग करताना पाकने आक्रमक सुरुवात केली. त्यांच्याकडून कर्णधार अझहर अलीने ४४, अहमद शहजादने १३ तर मोहंमद हाफिजने ३७ धावांचे योगदान दिले. मधल्या फळीत बाबर अाझमने ५१ आणि शोएब मलिकने ५२ धावा काढून अर्धशतक ठोकले. मलिकने अवघ्या ३४ चेंडूंत २ षटकार, ३ चौकारांसह ५२ धावांची खेळी केली. पाकचा संपूर्ण डाव ४०.४ षटकांत २७१ धावांत संपुष्टात आला. डिव्हिलर्सच्या नावे विश्वविक्रम : वनडेत वेगवान शतक ठोकण्याचा विक्रम ए.बी. डिव्हिलर्सच्या नावे आहे. त्याने जानेवारी २०१५ मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध अवघ्या ३१ चेंडूंत शतक ठोकले होते.