आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Defeat Pakistan In Sharjah By 6 Wicket, Woakes, Taylor Inspired

वोग्स, टेलर, बटलर तळपले, तिसऱ्या वनडेत इंग्लंडची पाकवर ६ विकेटने मात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शारजा- वेगवान गोलंदाज क्रिस वोग्स (४० धावांत ४ विकेट) आणि जेम्स टेलरच्या (नाबाद ६७) शानदार अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने पाकिस्तानवर सहज ६ विकेटने मात केली. वोग्सच्या घातक गोलंदाजीमुळे इंग्लंडने पाकला ४९.५ षटकांत अवघ्या २०८ धावांत रोखले. यानंतर विजयासाठी आवश्यक असलेले लक्ष्य ४१ षटकांत ४ विकेटच्या मोबदल्यात २१० धावा काढून सहजपणे गाठले. या विजयासह इंग्लंडने चार सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे.

युनायटेड अरब अमिरात येथे २००९ पासून आतापर्यंत झालेल्या मालिकेत नववा मालिका पराभव टाळण्याची पाककडे शुक्रवारी एकमेव संधी असेल. २००९ पासून अरब अमिरात येथे झालेल्या १० पैकी आठ मालिका पाकने गमावल्या आहेत. इंग्लंडविरुद्धची ही ११ वी मालिका आहे. पाकने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पाककडून मोहंमद हाफिजने सर्वाधिक ४५ धावा काढल्या. इतरांनी निराशा केली.

टेलर-बटलरची शतकी भागीदारी
धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची टीम २ बाद २७ धावा अशी अडचणीत सापडली होती. मधल्या फळीत जेम्स टेलर (नाबाद ६७) आणि जोस बटलर (नाबाद ४९) यांनी पाचव्या विकेटसाठी ११७ धावांची अभेद्य भागीदारी करून विजय साजरा केला. टेलरने ६९ चेंडूंत २ षटकार, ६ चौकारांसह ६७ धावांचे योगदान दिले.