आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बेन स्टोक्स, बॉलच्या खेळीने इंग्लंडची बांगलादेशवर मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मीरपूर - अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सचे (१०१) शतक आणि गोलंदाज जॅक बॉलने घेतलेल्या ५ विकेटच्या बळावर इंग्लंडने मालिकेतील पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशला २१ धावांनी हरवले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद ३०९ धावा काढल्या. यानंतर इंग्लंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशला ४७.५ षटकांत २८८ धावांत गुंडाळून रोमांचक विजय मिळवला. इंग्लंडकडून पाच गडी बाद करणारा गोलंदाज जॅक बॉल सामनावीर ठरला. बांगलादेशकडून सलामीवीर इमारुल कायेसने ठोकलेले शतक (११२) व्यर्थ ठरले.

धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची टीम एकवेळ चांगल्या स्थितीत होती. मात्र, जॅक बाॅलने धारदार गोलंदाजी करून इंग्लंडला सामन्यात परतवले. धावांचा पाठलाग करताना बांगलदेशने नियमित अंतराने विकेट गमावल्या. एका टोकाने एकेक गडी बाद होत असताना दुसऱ्या टोकावर इमारुल कायेसने ११२ धावा काढून बांगलादेशला विजयासमीप आणले होते. कायेसने ११९ चेंडूंचा सामना करताना २ षटकार आणि ११ चौकार मारले. अष्टपैलू खेळाडू सकिब-अल-हसनने अवघ्या ५५ चेंडूंत ७९ धावांची तुफानी खेळी करून इंग्लंडला घाम फोडला होता. मात्र, विजयाजवळ येऊन बांगलादेशने हाराकिरी केली. २८० च्या स्कोअरवर इमारुल कायेस बाद झाला. यानंतर ४८व्या षटकात बांगलादेशचा डाव २८८ धावांत आटोपला. इंग्लंडकडून पहिला सामना खेळणाऱ्या जॅक बॉलने ५१ धावांत ५ गडी बाद केले, तर आदिल रशीदने ४९ धावांत चौघांना टिपले. तीन सामन्यांच्या मालिकेत आता इंग्लंड १-० ने पुढे आहे. मालिकेतील दुसरा एकदिवसीय सामना ९ ऑक्टोबर रोजी मीरपूर येथेच खेळवला जाईल.

बेन स्टोक्सची तुफानी खेळी
इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र, इंग्लंडची टीम ३ बाद ६३ धावा अशी संकटात सापडली होती. बांगलादेशने इंग्लंडला दबावात आणले होते. मात्र, बेन स्टोकसने बेन डकेटसोबत चोथ्या विकेटसाठी १५३ धावांची उपयुक्त भागीदारी केली. स्टोक्सने १०१, तर डकेटने ६० धावांची खेळी केली. यानंतर कर्णधार जोस बटलरने ६३ धावा काढून इंग्लंडला ८ बाद ३०९ पर्यंत पोहोचवले. बांगलादेशकडून मुर्तुजा, शफिऊल इस्लाम, सकिब यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
बातम्या आणखी आहेत...