आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्लंडचा रुट नंबर वन कसोटी फलंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - अॅशेस मालिकेत इंग्लंडच्या विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा मधल्या फळीचा फलंदाज जो. रुट जगातला नंबर वन कसोटी फलंदाज ठरला आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या आयसीसीच्या ताज्या क्रमवारीत नंबर वनच्या सिंहासनावर तो विराजमान झाला आहे.
जो. रुटने अॅशेस मालिकेतील चार सामन्यांत ७३.८३ च्या सरासरीने ४४३ धावा काढल्या. यात त्याने दोन शतके ठोकली. जो. रुटच्या नावे ९१७ गुण आहेत. रुटने आफ्रिकेचा स्टायलिश फलंदाज ए. बी. डिव्हिलर्सला सिंहासनावरुन दूर करून आपले साम्राज्य स्थापन केले. डिव्हिलर्स दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे. त्याच्या नावे ८९० गुण आहेत. ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज स्टीव्हन स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावे ८८४ गुण आहेत. द. आफ्रिकेचा हाशिम आमला चौथ्या क्रमांकावर असून त्याच्या नावे ८७४ गुण आहेत. श्रीलंकेचा कुमार संगकारा पाचव्या क्रमांकावर आहे.

गोलंदाजांच्या यादीत आफ्रिकेची तोफ वेगवान गोलंदाज डेल स्टेन नंबर वनच्या खुर्चीवर कायम आहे. दुसऱ्या क्रमांकावर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड असून नाॅटिंगहॅम कसोटीत त्याने ९ गडी बाद करताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला होता. इंग्लंडचा जेम्स अँडरसन तिसऱ्या, तर न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तानचा फिरकीपटू यासिर शाह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताचा कसोटी कर्णधार कोहली फलंदाजांच्या यादीत दहाव्या क्रमांकावर आहे.

टॉप-५ कसोटी फलंदाज
क्रम खेळाडू देश गुण
०१. जो. रुट इंग्लंड ९१७
०२. ए. बी. डिव्हिलर्स द. आफ्रिका ८९०
०३. स्टीव्हन स्मिथ ऑस्ट्रेलिया ८८४
०४. हाशिम आमला द. आफ्रिका ८७४
०५. कुमार संगकारा श्रीलंका ८६०

टाॅप-५ कसोटी गोलंदाज
क्रम खेळाडू देश गुण
०१. डेल स्टेन द. आफ्रिका ९०५
०२. स्टुअर्ट ब्रॉड इंग्लंड ८५२
०३. जेम्स अँडरसन इंग्लंड ८१५
०४. ट्रेंट बोल्ट न्यूझीलंड ८१४
०५. यासिर शाह पाकिस्तान ८१०