आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • England Thrash New Zealand By 210 Runs After Scoring A Record 408 9 In The First Odi

पहिल्या वनडेत इंग्लंडचा मोठा विजय, जन्मदाता ४४ वर्षांनी ४०० च्या पुढे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्मिंगहॅम - इंग्लंडने पहिल्या वनडे क्रिकेट सामन्यात वर्ल्डकप उपविजेता न्यूझीलंडला २१० धावांनी पराभूत केले. इंग्लंडसाठी जो. रुट (१०४) आणि ज्योस बटलर (१२९) यांनी शानदार फलंदाजी केली. गोलंदाजीतही इंग्लंडचा स्टीव्हन फिन (४ िवकेट) आणि आदिल रशीद (४ विकेट) यांनी चांगले प्रदर्शन केले. बटलर सामनावीर ठरला. इंग्लंडने ९ बाद ४०८ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडला १९८ धावाच काढता आल्या.

जन्मदाता ४४ वर्षांनी ४०० च्या पुढे
इंग्लंडला वनडे क्रिकेटमध्ये ४०० चा आकडा पार करण्यासाठी ६४६ वनडे आणि ४४ वर्षे वाट बघावी लागली. इंग्लंडने १९७१ पासून वनडे खेळण्यास सुरुवात केली आणि २०१५ मध्ये त्यांनी या आकड्याला गाठले. यापूर्वी इंग्लंडचा सर्वश्रेष्ठ स्कोअर ३९१ धावा असा होता. हा स्कोअर त्यांनी २००५ मध्ये बांगलादेशविरुद्ध केला होता. इंग्लंडमध्ये प्रथमच ४०० धावा झाल्या.