आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंग्लंडचा डाव ३८९ धावांत आटोपला, प्रत्युत्तरात न्यूझीलंडची दमदार सुरुवात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटीत लॉर्ड्स मैदानावर दुसर्‍या दिवशी शुक्रवारी सकाळी ७ बाद ३५४ वरून पुढे खेळताना यजमान इंग्लंडचा डाव ३८९ धावांतच आटोपला. प्रत्युत्तरात दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत न्यूझीलंडने बिनबाद १३० धावा काढून दमदार सुरुवात केली. न्यूझीलंडकडून सलामीवीर मार्टिन गुप्तिल ५९, तर लँथम ५२ धावांवर खेळत होते.
शुक्रवारी मोईन अलीने आपले अर्धशतक पूर्ण केले. गुरुवारी तो ४९ धावांवर नाबाद होता. मोईन अलीने १०७ चेंडूंचा सामना करताना ९ चौकारांच्या साह्याने ५८ धावा काढल्या. स्टुअर्ट ब्रॉडने ३, तर जेम्स अँडरसनने ११ धावा काढल्या. मार्क वुड ८ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडच्या पहिल्या डावात २७ अतिरिक्त धावांचेही योगदान राहिले. अत्यंत गचाळ सुरुवातीतून सावरताना मधल्या फळीतील चार फलंदाजांच्या अर्धशतकाने इंग्लंडला संकटातून बाहेर काढले.

इंग्लंडने पाचव्या, सहाव्या आणि सातव्या विकेटसाठी ३२४ धावा जोडल्या. जो रुटने ११ चौकारांच्या मदतीने ९८ धावा ठोकल्या. अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने १५ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९२ धावा फटकावल्या. बटलने ९ चौकारांच्या साह्याने ६७ धावा जोडल्या.

बोल्टच्या ४ विकेट
न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने २९ षटकांत ७९ धावांत ४ गडी बाद केले. मॅट हेन्रीने २४.५ षटकांत ९३ धावांत ४ गडी टिपले. टिम साउथीने १०४ धावांत १, तर मार्क क्रेगने ७७ धावांत १ गडी बाद केला. शुक्रवारी सकाळी इंग्लंडचा डाव १०.५ षटकांत ३५ धावा जोडून ३८९ धावांत आटोपला.

संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : ३८९. (जो रुट ९८, स्टोक्स ९२, बटलर ६७, मोईन अली ५८, ४/७९ ट्रेंट बोल्ट, ४/९४ मॅट हेन्री) न्यूझीलंड पहिला डाव : बिनबाद १३०. (गुप्तिल नाबाद ५९, लँथम नाबाद ५२)
बातम्या आणखी आहेत...