आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • England Vs Pakistan, Live 2017 ICC Champions Trophy First Semi Final At Cardiff Sophia Gardens Stadium

चॅम्पियन्‍स ट्रॉफी: पाकची पहिल्यांदाच फायनलमध्ये धडक, इंग्लंडवर 8 गडी राखून मात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्डिफ -पाकिस्तानने बलाढ्य यजमान इंग्लंडला पहिल्या सेमीत लोळवले. पाकिस्तानने गड्यांनी साहेबांवर अविश्वसनीय वाटणारा विजय मिळवत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात प्रथमच अंतिम फेरीत प्रवेश केला. आता पाकला फायनलमध्ये रविवारी भारत किंवा बांगलादेशशी लढावे लागणार आहे.
 
इंग्लंडने दिलेल्या २११ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकच्या अझहर अली (७६) आणि झमानच्या (५७) अर्धशतके झळकावली. हे दोघे बाद झाल्यावर बाबर आझम (नाबाद ३८) मोहम्मद हाफिजने (३१) इंग्रजांना डोके वर काढू दिले नाही. तत्पूर्वी, हसन अली (३ बळी), जुनैद खान आणि रईसच्या प्रत्येकी बळींमुळे पाकने इंग्लंडच्या डावाला खिंडार पाडले.
 
तीन वेगवान गोलंदाज हसन अली (३/३५), जुनैद खान (२/४४) आणि पदार्पणाचा सामना खेळणारा रुम्मन रईस (२/४४) यांच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये यजमान इंग्लंडला अवघ्या २११ धावांत गुंडाळले. इंग्लंडकडून जो. रुटने सर्वाधिक ४६ धावा तर जॉनी बेयरस्ट्रोने ४३ धावा काढल्या. हसन अलीने मोर्गन, स्टोक्स यांच्या विकेट घेत, चॅम्पियन्स ट्रॉफीत सर्वाधिक १० विकेट घेणारा तो पाकिस्तानी गोलंदाज बनला.
बातम्या आणखी आहेत...