राजकोट - टीम इंडियामधील ऑलराऊंडर रवीद्र जडेजा याचा 17 एप्रिल रोजी विवाह होत आहे. त्या निमित्ताने त्याच्या सासऱ्याने त्याला जवळपास एक कोटी रुपये किमतीची ऑडी क्यू-745 गिफ्ट दिली आहे. सोमवारी जडेजा आणि त्याची पत्नी यांनी शोरूमध्ये जाऊन ही कार घेतली. कारची डिलिव्हरी घेताच तो पत्नी रिवाबासह ड्राइव्हवर गेला.
गिफ्ट मिळाल्यानंतर काय म्हणाला जडेजा...
सासऱ्याकडून लक्झरी कार गिफ्ट मिळाल्यानंतर, असा सासरा सर्वांना मिळावा असे जडेजा गमतीत म्हणाला. मी ही कार मिळाल्याने खूप आनंदी आहे. आतापर्यंत मी फोर मॉडेलची ऑडी वापरत होतो. मला पुढचे व्हर्जन हवे होते. योगायोग म्हणजे मला गिफ्ट तेच मिळाले.
रिवाबासह गेला कार आणायला
राजकोटच्या ऑडी शोरूममध्ये रवींद्र जडेजा त्याची भावी पत्नी रिवाला सोलंकीसह कार घेण्यासाठी गेला होता. शोरूमध्ये त्याने कारवरील कव्हर हटवले. यावेळी रिवाबाने हा क्षण कॅमेऱ्यात टिपला.
पुढील स्लाइड्सवर पाहा, PHOTOS