आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची कसाेटी!, दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील पहिला सामना आजपासून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदिगड - वनडे अाणि टी-२० मालिकेतील लाजिरवाण्या पराभवातून सावरलेल्या भारतीय संघाची अाता टेस्ट सिरीजमध्येही कसाेटी लागणार अाहे. दाेन मालिका विजयांसह पाहुणा दक्षिण अाफ्रिका संघ सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. यजमान भारत अाणि दक्षिण अाफ्रिका यांच्यातील कसाेटी मालिकेला गुरुवारपासून प्रारंभ हाेत अाहे. मालिकेतील सलामीची कसाेटी माेहालीच्या मैदानावर सुरू हाेणार अाहे. मालिका विजयाची हॅट्ट्रिक करण्याच्या इराद्याने अाफ्रिका टीम मैदानावर उतरणार अाहे. काेहलीच्या नेतृत्वात टीम इंडिया अाफ्रिकेला राेखण्याचा प्रयत्न करेल.

भारतीय संघाचा कसून सराव
काेहलीच्या नेतृत्वाखाली यजमान भारतीय संघाने बुधवारी पहिल्या कसाेटीच्या तयारीसाठी कसून सराव केला. सकाळी ९ वाजता भारतीय संघ सरावासाठी दाखल झाला हाेता. सुरुवातीला धावण्याचा सराव करून भारताच्या फलंदाजांनी नेटवर फलंदाजी केली. या वेळी मैदानावर रवी शास्त्री यांनी वरुण अॅराेनसाेबत बराच वेळ चर्चा केली. त्याच्याकडून त्यांनी नेटवर कसून गाेलंदाजीचा सरावही करून घेतला. दुसरीकडे भारताचा युवा फलंदाज राेहित शर्माने फलंदाजीचा सराव केला. त्यानंतर शास्त्री यांनी रवींद्र जडेजालाही विशेष मार्गदर्शन केले. फलंदाजीचे प्रशिक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली कसाेटी कर्णधार विराट काेहलीने खास सराव केला. तसेच उमेश यादव अाणि भुवनेश्वरकुमार यांनीही बराच वेळ नेटवर गाेलंदाजीसाठी घाम गाळला.
तसेच पाहुण्या दक्षिण अाफ्रिकेच्या फलंदाजांनीही कसून सराव केला. हाशिम अामलाच्या नेतृत्वाखाली दक्षिण अाफ्रिकेचा संघ सलामीच्या कसाेटीमध्ये मैदानावर उतरणार अाहे.

कर्णधार काेहलीसमाेर ‘विराट’ अाव्हान
श्रीलंकेत २२ वर्षांनंतर भारताला कसाेटी मालिका जिंकून देणाऱ्या विराट काेहलीसमाेर अाता घरच्या मैदानावर अाफ्रिका टीमचे तगडे अाव्हान असेल. कारण मागील ९ वर्षांपासून दक्षिण अाफ्रिका टीम विदेशी खेळपट्टीवर अजेय राहिली अाहे. त्यामुळे अाता भारताविरुद्ध मालिका जिंकून अापली ही लय कायम ठेवण्याचा अाफ्रिका टीमचा प्रयत्न असेल. जगातील अव्वल फलंदाज डिव्हिलर्स, हाशिम अामला, फाफ डुप्लेसिस, डेल स्टेन, इम्रान ताहिरसारखे अव्वल खेळाडू अाफ्रिका टीमकडून सज्ज झाले अाहेत. त्यामुळे भारतीय गाेलंदाजांना माेठी कसरत करावी लागेल.

संभाव्य संघ
भारत :
विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, लाेकेश राहुल, वृद्धिमान साहा, राेहित शर्मा, रवींद्र जडेजा, वरुण अॅराेन, भुवनेश्वर, स्टुअर्ट बिन्नी, उमेश यादव, ईशांत शर्मा, अश्विन, अमित मिश्रा.

दक्षिण अाफ्रिका : हाशिम अामला (कर्णधार), ए. बी. डिव्हिलर्स, फाफ डुप्लेसिस, डेन विलास, टेंबा बाउमा, डीन एल्गर, माेर्ने माेर्केल, इम्रान ताहिर, वेर्नाेन फिलेंडर, कागिसाे रबाडा, डेन पीट, डेल स्टेन, स्टेन वान जिल.

दाेन वर्षांत भारताने खेळल्या १७ कसाेट्या
भारतीय संघ दाेन वर्षांनंतर घरच्या मैदानावर कसाेटी खेळण्यासाठी उतरणार अाहे. यादरम्यान भारताने न्यूझीलंड, दक्षिण अाफ्रिका, इंग्लंड, अाॅस्ट्रेलिया, बांगलादेश अाणि श्रीलंकेच्या दाैऱ्यात एकूण १७ कसाेट्या खेळल्या अाहेत. या वेळी भारताला श्रीलंका दाैऱ्यामध्ये मागील दाेन दशकातील पराभवाची मालिका खंडित करता अाली.