आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकाऱ्यांना पाहाताच मास्क लावून झोपला बुकी, फोन टाकले टॉयलेटमध्ये

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -आयपीएल-8 वरही मॅच फिक्सिंगचे सावट घोंघावत आहे. आयपीएलच्या विद्यमान सत्रातील कमीत कमी पाच सामन्यांमध्ये स्पॉट फिक्सिंग झाली असण्याची शंका व्यक्त करण्यात आली असून त्याची इन्फोर्समेंट डायरेक्टर चौकशी करीत आहे. या प्रकरणी शुक्रवारी देशात अनेक ठिकाणे छापे टाकण्यात आले. मुंबईत जेव्हा ईडीचे पथक एका बुकीच्या घरी पोहोचले तेव्हा त्यांना पाहाताच बुकीच्या पत्नीने घरातील सर्व मोबाइल फोन आणि सिमकार्ड टॉयलेटमध्ये टाकले. बुकी ऑक्सिजन मास्क लावून बेडवर आडवा झाला.
तपास सूत्रांच्या माहितीनूसार, स्पॉट फिक्सिंगच्या आरोपात दोन संघाची चौकशी सुरु आहे. वास्तविक हे संघ कोणते आहेत हे अद्याप उघड झालेले नाही. त्यामुळे ईडीने मुंबईत दोन ठिकाणी बुकीजवर छापेमारी केली आहे. त्याशिवाय जयपूर, दिल्ली येथे बुकीज आणि संघ अधिकाऱ्यांवर छापे टाकले गेले आहेत. जयपूरमध्ये शिबू गंगवाल आणि दिल्लीत मुकेश शर्मा याच्या घरावर छापा टाकला. आयपीएल-6 मध्ये स्पॉट फिक्सिंग झाल्याचे समोर आले होते. त्यावेळी क्रिकेटर श्रीसंतसह अनेकांना अटक झाली होती. या प्रकरणी आज (शनिवार) दिल्लीतील एका न्यायायलात सुनावणी होणार आहे.
मुंबईसह दिल्ली आणि जयपूरमध्ये बुकीजवर छापे
ईडीने मुंबईत दोन ठिकाणी छापेमारी केली. बोरिवली आणि अंधेरी येथील बुकीजच्या घरांवर छापे टाकण्यात आले. ज्या बुकीजच्या घरावर छापे टाकण्यात आले त्याचे नाव सुखविंदर सोढी आहे. तसेच उल्हासनगरमध्ये अनिल जयसिंहानी याच्याही घरी ईडीचे पथक जाऊन आले. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की जयसिंहानीची कसून चौकशी केली जात आहे. त्याचे आयपीएलच्या दोन संघाच्या अधिकाऱ्यांशी संबंध आहेत. पश्चिम भारतात या बुकीजचे मोठे नेटवर्क आहे. जयसिंहानी टीम अधिकाऱ्यांकडून खेळाडू, टीम पोजिशन आणि फिल्ड कंडीशनबाबात माहिती घेत होता. दिवसभर चाललेल्या छापेमारीर ईडीच्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्र आणि फोन क्रमांक मिळाले आहेत. जयसिंहानीचे नाव 2013 मध्येही स्पॉट फिक्सिंगमध्ये आले होते.