आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Five Key Reasons Behind Team India Losing Series To Australia

विराटच्या स्लो बॅटिंगसह ही आहेत भारताच्या लाजीरवाण्या पराभवाची 5 प्रमुख कारणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच सामन्यांची एक दिवसीय मालिका भारताने 0-3 अशा लाजीरवाण्या फरकाने गमावली आहे. काल झालेल्या तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला तीन विकेट्सनी धूळ चारली. टीम इंडियाने विराट कोहलीच्या (117) शतकाच्या बळावर 295 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाने मॅक्सवेलच्या 96 धावांच्या बळावर सामन्यासह मालिका जिंकली.
ही आहेत पराभवाची प्रमुख कारणे
- स्लो बॅटिंग
- खराब बॉलिंग
- वाईट फिल्डिंग
- मॅक्सीची दमादार बॅटिंग
- स्लॉग ओव्हर्स राहिले टर्निंग पॉईंट्स
यापूर्वी टीम इंडियाने पहिला एकदिवसीय सामना 5 विकेट्सनी तर दुसरा 7 विकेट्सनी गमावला होता. विशेष म्हणजे या प्रत्येक सामन्यात भारताच्या फलंदाजांनी एक शतक झळकावले. तरीही पराभव पदरात पडला.
सिनिअर क्रिकेटर्स म्हणाले, की
माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर- टीम इंडिया बदलांच्या टप्प्यातून जात आहे हे मी स्वीकारु शकत नाही. हे कारण चालणार नाही. पहिल्या दोन सामन्यांमध्ये भारताचा 300 वर स्कोअर झाला होता. पण गोलंदाजांची सुमार कामगिरी पराभवाचे कारण ठरली.
माजी कर्णधार सौरभ गांगुली- महंमद शमी चोटिल आहे. उमेश यादव, इशांत शर्मा आणि रविंद्र जडेजा अनुभवी बॉलर आहेत. त्यांनी स्थानिक पातळीवर अनेक मॅचेस खेळल्या आहेत. आता आणखी किती अनुभव हवा.
पुढील स्लाईडवर वाचा, भारताच्या पराभवाची ठळक कारणे......
भारताचा स्कोअरबोर्ड
फलंदाज रन बॉल 4 6
रोहित शर्मा कॅ. वेड बो. रिचर्डसन 6 11 0 0
शिखर धवन बो. हेस्टिंग्स 68 91 9 0
विराट कोहली कॅ. बेली बो. हेस्टिंग 109 109 6 2
अजिंक्य रहाणे कॅ. मॅक्सवेल बो. हेस्टिंग 50 55 4 1
एमएस धोनी कॅ. मैक्सवेल बो. हेस्टिंग 23 9 2 2
गुरकीरत मान बो. फल्कनर 8 7 1 0
रवींद्र जडेजा नॉट आउट 6 5 0 0
रिषि धवन नॉट आउट 3 5 0 0
ऑस्ट्रेलियाचा स्कोअरबोर्ड
फलंदाज रन बॉल 4 6
शॉन मार्श कॅ. धोनी बो. इशांत 62 73 6 0
एरॉन फिंच कॅ. धोनी बो. यादव 21 23 3 0
स्टीवन स्मिथ कॅ. रहाणे बो. जडेजा 41 45 5 0
जॉर्ज बेली स्टम्पिंग धोनी बो. जडेजा 23 21 3 0
ग्लेन मॅक्सवेल कॅ. धवन बो. उमेश यादव 96 83 8 3
मिचेल मार्श रन आउट 17 14 3 0
मॅथ्यू वेड कॅ. धवन बो. इशांत 6 4 0 0
जेम्स फल्कनर नॉट आउट 21 25 1 0
हेस्टिंग नॉट आउट 0 0 0
0