आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धोनीची ब्रँड व्हॅल्यू तब्बल 135 कोटी, रोनाल्डो-बोल्टसारख्या दिग्गजांनाही टाकले मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वन डे आणि टी-20 टीमचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा समावेश फोर्ब्सने जगातील टॉप-10 व्हॅल्यूएबल प्लेयर्समध्ये केला आहे. शनिवारी फोर्ब्सचा रिपोर्ट प्रसिद्ध झाला. या रिपोर्टनुसार, माहीने पोर्तुगाल आणि रियाल मैड्रिड क्लबचा धुरंधर स्ट्रायकर क्रिस्टियानो रोनाल्डो आणि वेगाचा बादशाह यूसैन बोल्डलाही मागे टाकले.
नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या यादीत धोनीची ब्रँड व्हॅल्यू 135.4 कोटी रुपये एवढी दाखवण्यात आली आहे. महेंद्रसिंह धोनी सध्या द. आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या वन डे सीरीजमध्ये व्यस्त आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील अंतीम सामना आज मुंबईत डे-नाईट खेळला जात आहे. आम्ही आपल्याला जगातील टॉप-10 व्हॅल्यूएबल अॅथलीट्सविषयी माहिती देत आहोत.
पुढील स्लाइड्सवर जाणूनघ्या अॅथलीट्सची ब्रँड व्हॅल्यू (कोटी रुपयांमध्ये)... आणि फोर्ब्सने 2015 च्या लिस्टमध्ये कुणाला दिले कोणते स्थान...