आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Cricketer Sunil Gavaskar Birthday Special

... अन्‍यथा गावस्‍कर मासे पकडत असते, वाचा चकीत करणा-या 10 बाबी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्‍कर यांनी काल (10 जुलै) आपला 66 वा वाढदिवस साजरा केला. 80 च्‍या दशकात प्रत्‍येक गोलंदाजासाठी दरारा बनून राहिलेले गावस्‍कर आपल्‍या आयुष्‍यात नशिब आणि अंधविश्‍वासालाही स्‍थान देतात. त्‍यांच्‍या विषयीच्‍या दहा नवीन गोष्‍टी वाचून आपण दंग होऊ शकतो.
ते म्‍हणतात, माझ्या करियरच्‍या सुरूवातीला नशिबानेच मला साथ दिली. होऊ शकते की त्‍यांच्‍या नशिबानेच त्‍यांना महान क्रिकेटपटू बनवले. अन्‍यथा त्‍यांच्‍या जन्‍माच्‍या वेळी घडलेली एक घटना त्‍यांना मच्‍छिमार बनवू शकली असती.
मच्‍छिमाराने चोरले बाल गावस्‍कर
गावस्‍कर यांच्‍या जन्‍म झाला होता तेव्‍हा रूग्‍णालयात एका मच्‍छिमाराने गावस्‍कर यांची व आपल्‍या बाळाची अदलाबदली केली होती. मात्र त्‍यांचे काका नारायण मसुरेकर यांनी ही चोरी पकडली होती. गावस्‍कर यांच्‍या डाव्‍या कानावर जन्‍मजात तिळ होता. त्‍याआधारे काकांनी सुनिल गावस्‍कर यांचा शोध घेतला. तेव्‍हा बाळ सुनिल हा मच्‍छिमाराजवळ झोपलेला मिळाला. यावेळी गावस्‍कर यांचे काका नसते तर, आज ते कदाचित मासे पकडत असते.
पुढील स्‍लाईडमध्‍ये वाचा गावस्‍करांबाबतच्‍या आपल्‍याला माहित नसणा-या दहा गोष्‍टी..