आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंग्‍लंडचे माजी वेगवान गोलंदाज \'टायफून\' यांचे निधन, जाणून घ्‍या FACTS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऑस्ट्रेलिया- इंग्‍लंडचे वेगवान गोलंदाज फ्रॅंक टायसन यांचे नुकतेच निधन झाले. ते 85 वर्षांचे होते. टायफून नावाने ते ओळखले जात. ऑस्ट्रेलियाच्‍या गोल्ड कोस्ट येथील रूग्‍नालयात त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. मागील अनेक दिवसांपासून ते ऑस्ट्रेलियाच्‍या गोल्ड कोस्टमध्‍ये राहत होते. टायसन यांनी इंग्‍लंडकडून 1954 ते 1959 या कालावधित खेळले. केवळ 17 कसोटी सामने ते खेळले आहेत. मात्र, या सामन्‍यांमध्‍ये त्‍यांनी 76 बळी घेतले. 1954-55 मध्‍ये ऑस्ट्रेलियच्‍या मैदानावर झालेल्‍या अॅशेज मालिकेतही त्‍यांनी चमकदार कामगिरी केली होती.

- ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार रिची बेनो त्‍यांना सर्वात वेगवान गोलंदाज मानत होते.
- त्‍यांची अॅक्‍शन आणि उंचीमुळे करियरमध्‍ये त्‍यांना अनेक दुखापतींचा सामना करावा लागला.
-30 वर्षांचे वय असतानाच त्‍यांनी क्रिकेटमधून निवृत्‍ती घेतली.
- डरहम विद्यापीठात त्‍यांनी इंग्रजी साहित्‍यात पदवी मिळवली होती. उच्‍चशिक्षीत खेळाडू म्‍हणून त्‍यांच्‍याकडे पाहिले जात होते.
- निवृत्‍तीनंतर त्‍यांनी मेलबर्नमध्‍ये अध्‍यापनाचे कार्य केले.
- इंग्रजी, फ्रेंच आणि इतिहास या विषयांवर त्‍यांचे प्रभुत्‍व होते.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, फ्रॅंक टायसन यांचे Black & White photos..