आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताचा माजी आक्रमक सलामीवीर वीरेंद्र सेहवागच्या कैफला अनोख्या स्टाइलमध्ये शुभेच्छा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : क्रिकेटचे मैदान असो की सोशल मीडिया..दोन्ही जागी जोरदार फटकेबाजीसाठी टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग प्रसिद्ध आहे. मैदानावर सेहवाग ज्या पद्धतीने गोलंदाजांना बदडून प्रेक्षकांचे मनोरंजन करायचा त्याचप्रमाणे तो टि्वटरवर आपल्या अनोख्या पद्धतीने चाहत्यांचे मनोरंजन करतो. एखाद्याला शुभेच्छा देण्याची वीरूची स्वत:ची वेगळीच स्टाइल आहे. त्याच्या या स्टाइलचे अनेक चाहते झाले आहेत.
या वेळी माजी क्रिकेटपटू मोहंमद कैफला त्याने आपल्या अनोख्या शैलीने शुभेच्छा दिल्या. कैफने १ डिसेंबर रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. क्रिकेटच्या मैदानावर मोहंमद कैफ आपल्या शानदार क्षेत्ररक्षणासाठी अोळखला जायचा. यामुळे सेहवागने त्याला त्याच्याच शैलीत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

सेहवागने टि्वटरवर म्हटले की, ‘उड जा काले कावा, तेरे मूंह विच खंड पावा. कैफ म्हणजे असाच या गाण्यासारखा आहेस. कुठेही उडत असतोस. तू माणूस आहेस की पतंग? हॅपी बथर्ड कैफ.’यानंतर मोहंमद कैफ सेहवागच्या या शुभेच्छावर जोरदार हसला. कैफने त्याला उत्तर दिले. कैफ म्हणाला,‘हाहाहा. धन्यवाद वीरू. मला वाटते वीरू तूसुद्धा ‘दे दणादण’या चित्रपटाच्या टायटलला चित्रपट रिलीज होण्याआधीच खूप सिरियसली घेतले आहे. नेहमी असेच सर्वांचे मनोरंजन करत राहा.’कैफने टीम इंडियाकडून १३ कसोटी आणि १२५ वनडे सामने खेळले आहेत. कसोटीत कैफने ४०.३१ च्या स्ट्राइक रेटने ६२४ धावा काढल्या, तर वनडेत त्याने ७०.०३ च्या स्ट्राइक रेटने २७५३ धावा काढल्या आहेत.

सेहवागलासुद्धा तसेच प्रत्युत्तर
सेहवाग नेहमी आपल्या अनोख्या शैलीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असतो. काही दिवसांपूर्वी सेहवागचा वाढदिवस होता तेव्हा त्याच्या मित्रांनी, चाहत्यांनी सेहवागला त्याच्याच शैलीत शुभेच्छा दिल्या होत्या. तेव्हा समालोचक हर्षा भोगले, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेसुद्धा सेहवागला शुभेच्छा दिल्या होत्या. सचिनच्या शुभेच्छावर सेहवागने त्याला रिटर्न गिफ्ट म्हणून तेव्हा जिओचे सिमकार्ड मागितले होते.
बातम्या आणखी आहेत...