आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण फिल्मी आहे एकच लग्न दोनदा केलेल्या गांगुलीची लव्ह स्टोरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमधील एक सौरव गांगुली क्रिकेट मैदानापासून दूर झाला आहे, परंतु क्रिकेटपासून नाही. काही दिवसांपूर्वी बीसीसीआयच्या नवगठित सल्लागार समितीमध्ये सहभागी झालेला गांगुली 43 (8 जुलै, 1972) वर्षांचा झाला आहे. सौरव गांगुलीच्या क्रिकेट करिअरबद्दल तर सर्वांनाच माहिती असेल, परंतु फार कमी लोकांना हे माहिती असेल की सौरवने पत्नी डोनासोबत एकदा नाही तर दोनदा लग्न केले आहे. त्यांची लव्ह स्टोरी आणि लग्न एखाद्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही.

सौरव आणि डोनाची लव्ह स्टोरी
- सौरव आणि डोना शेजारी होते, परंतु हे दोन्ही कुटुंब एकमेकांना पसंत कराव नव्हते
- दोघेही वेगवेगळ्या शाळेमध्ये शिकत होते. शालेय जीवनातच यांची लव्ह स्टोरी सुरु झाली होती.
- 1996 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी सौरवने पहिल्यांदा डोनाला प्रपोज करून लग्नाची मागणी घातली.
- दौऱ्यावरून परत येताच दोघांनी एका मित्राच्या मदतीने कोर्ट मॅरेज करण्याचा निश्चय केला. तिघेही रजिस्ट्रार ऑफिसमध्ये पोहोचलेच होते, तेवढ्यात मिडीयाला यांच्या लग्नाची बातमी समजली आणि लग्न न करता त्यांना परत घरी यावे लागले.
- त्यानंतर 12 ऑगस्ट 1996 मध्ये या कपलने गुपचूप कोर्ट मॅरेज केले. लग्नाविषयी कोणतीही माहिती कुटुंबियांना न देत सौरव श्रीलंका दौऱ्यावर निघून गेले.
- काही दिवसांनंतर लग्नाची बातमी सर्वांसमोर आली. विरोध असतानाही शेवटी दोघांच्याही कुटुंबियांना माघार घ्यावी लागली आणि 21 फेब्रुवारी 1997 मध्ये पुन्हा एकदा संपूर्ण विधी-परंपरेनुसार या दोघांचे लग्न झाले.
- सौरव आणि डोना यांची मुलगी सना गांगुलीचा जन्म 3 नोव्हेंबर 2001 मध्ये झाला.

पुढील स्लाईड्सवर पाहा, सौरव, पत्नी डोना गांगुली आणि मुलगी सनाचे काही खास फोटो...
बातम्या आणखी आहेत...