आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former Indian Cricketer Virender Sehwag Exclusive Interview

EXCLUSIVE: वीरेंद्र सेहवागला 11 प्रश्न, पहिल्यांदाच सांगितल्या या खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
"शरीर आता साथ देत नाही. या सत्रातील आणखी दोन रणजी सामने शिल्लक आहेत. असेही होऊ शकते की, हे शेवटचे वर्ष असेल आणि मी डोमेस्टिक क्रिकेटमधूनही निवृत्त होईल." ही माहिती खुद्द मुल्तानचा सुलतान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वीरेंद्र सेहवागने सांगीतली आहे. 'प्रॉमिस टू गिव यू बॅक' च्या अंतर्गत 'दुसरा सेहवाग' शोधण्यासाठी भोपाळला आलेल्या दिग्गज क्रिकेटरने आमच्याशी बोलताना स्वतः संबंधी अनेक नवीन गोष्टींचा उहापोह केला. आपल्या खडतर ट्रेनिंगपासून ते अचानक रिटायरमेंट जाहिर करे पर्यंतच्या अनेक गोष्टी त्याने आमच्याशी शेअर केल्या. आम्ही त्याच गोष्टी तुमच्याशी शेअर करत आहोत...
दुसऱ्या सेहवागच्या शोधात निघालो आहे...
जगात वीरेंद्र सेहवाग एकच नाही. मान्य आहे की, सर डॉन ब्रॅडमन यांनी सचिन तेंडुलकरमध्ये स्वतःला पाहिले आणि सचिनने मला त्याचा क्लोन म्हटले होते. मात्र जगात माझा कुणीही क्लोन नाही. दुसऱ्या सेहवागच्या शोधातच तर निघालो आहे. मात्र अद्याप पर्यंत तरी सापडला नाही.... प्रयत्न सुरू आहेत, जे देशाला दिलेला शब्द पूर्ण झाल्यावरच संपतील.
असे झाले वडिलांचे स्वप्न पूर्ण
वीरू म्हणाला, "वडिलांचे स्वप्न होते की, एक अशी शाळा असावी, जेथे चांगल्या शिक्षणाबरोबरच तेवढ्याच चांगल्या प्रकारची खेळाचीही सुविधा असावी. वडिलांचे हेच स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी हरियाणा मधील झज्जर येथे सेहवाग इंटरनॅशन स्कूलची स्थापना केली आहे. येथे चांगल्या शिक्षणाबरोबरच क्रिकेट, फुटबाल, व्हॉलीबॉल, हॅाकी, टेनिस, बॅडमिंटन, स्विमिंग आदी खेळांच्याही तेवढ्याच चांगल्या सुविधा आहेत. थोड्याच दिवसात यात बॉक्सिंग आणि स्नूकर सारखे खेळही सामिल होणार आहेत. क्रिकेटची कोचिंग तर मी स्वतःच देत आहे.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, वीरेंद्र सेहवागच्या EXCLUSIVE इंटरव्ह्यूमधून समोर आलेल्या आणखी 10 खास गोष्टी... आणि वीरेंद्र सेहवागच्या इंटरव्ह्यूचा EXCLUSIVE व्हिडिओ...