आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

63 वर्षाचा पाकिस्तान क्रिकेटर इम्रानने केले तिसरे लग्न! कोण आहे नवी नवरी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इम्रानने 42 वर्षाची रेहम खानसोबत जानेवारी, 2015 मध्ये लग्न केले. - Divya Marathi
इम्रानने 42 वर्षाची रेहम खानसोबत जानेवारी, 2015 मध्ये लग्न केले.
कराची- पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि राजकीय नेता इम्रान खानने तिसरे लग्न केले आहे. पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रानने नुकतेच लंडनमध्ये एका साध्या समारंभात हे लग्न केले. त्याच्या नव्या पत्नीचे नाव मरियम आहे. दरम्यान, इम्रानचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ (पीटीआय) ने हे वृत्त फेटाळले आहे. जसे की, रेहमसोबत लग्न झाल्यानंतर इम्रानने हे वृत्त फेटाळून लावले होते व नंतर मान्य केले होते. कोण आहे मरियम...
- मरियम इम्रानची 'आध्यात्मिक गाईड' बुशरा हिची बहिण आहे.
- बुशरा पाकपट्टन (पंजाब) मधील मेनका फॅमिलीची सून आहे. बुशराचे पती खवार फरीद मेनका कस्टम विभागात अधिकारी आहेत.
- दिलेल्या वृत्तानुसार, मरियम ही सुद्धा घटस्फोटित आहे. तिला दोन मुले आहेत तर इम्रान खान 63 वर्षाचा आहे.
पहिले लग्न : पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार जेमिमा
- इम्रानची पहिली पत्नी पाकिस्तानी-ब्रिटिश पत्रकार जेमिमा गोल्डस्मिथ होती.
- 1965 मध्ये दोघांचे लग्न झाले मात्र 2004 मध्ये दोघे वेगळे झाले.
- तिच्यापासून इम्रानला दोन मुले- सुलेमान आणि कासिम आहेत.
दूसरे लग्न : रेहम खान
- यानंतर इम्रानने 42 वर्षाची रेहम खानसोबत जानेवारी, 2015 मध्ये लग्न केले.
- रेहम सुद्धा जर्नालिस्ट आहे. त्याच वर्षी ऑक्टोबरमध्ये इम्रानने तिला घटस्फोट दिला.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, इम्रान खानच्या माजी पत्नीचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...