आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी होता PAK चा स्टार क्रिकेटर, हिंदू असल्याने आज अशी झाली अवस्था

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानातील साधारण घरात राहतो कनेरिया... - Divya Marathi
पाकिस्तानातील साधारण घरात राहतो कनेरिया...
स्पोर्ट्स डेस्क- दानिश कनेरिया, हे नाव कधी पाकिस्तान क्रिकेटमध्ये खूपच लोकप्रिय होते. मात्र, आज हा स्टार क्रिकेटर वाईट जीवन जगत आहे. अनेक काळानंतर कनेरिया मागील वर्षी जानेवारीत चर्चेत आला होता, याचे कारण मिडिया वृत्त आले होते की, कनेरियाने BCCIला मदत मागितली आहे. कनेरियाच्या म्हणण्यानुसार, हिंदू असल्या कारणाने पाकिस्तानात त्याच्यासमवेत भेदभाव होत आहे. गुजराती परिवारातील आहे कनेरिया...
- दानिया कनेरियाचा जन्म 16 डिसेंबर, 1980 रोजी कराचीत एका गुजराती फॅमिलीत झाला.
- मूळची: त्याची फॅमिली गुजरातमधील सूरत येथील आहे. तो पाकिस्तानातील हिंदू गुजराती कम्युनिटीचा आहे.
- कराचीतील एक गुजराती बिजनेसमॅन कावस मुला यांच्या सल्ल्यानुसार कनेरिया क्रिकेटमध्ये आला होता.
- पाकिस्तानचे माजी विकेटकीपर अनिल दलपत त्याचे कजिन आहेत.
- अनिल आणि कनेरिया हे दोघेच हिंदू क्रिकेटर पाकिस्तानकडून क्रिकेट खेळले आहेत.
म्हणाला होता, 'कधीपर्यंत जिवंत राहीन माहित नाही’
- जानेवारी, 2016 मध्ये आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार कनेरियाने म्हटले होते की, ‘मी मरू लागलो आहे, मला माहित नाही मी कधीपर्यंत जगेन’
- ‘माझ्याकडे काहीच पैसे उरले नाहीत. मी ज्वाईंट फॅमिलीत राहतो. आर्थिक ताणाताणीमुळे जीवन जगणे मुश्किल झाले आहे.’
- ‘मला हिंदू असल्या कारणानेच अशी जीवन जगावे लागत आहे जो पाकिस्तानात अल्पसंख्यक आहे’
- ‘मी युवा भारतीयांना स्पिन बॉलिंग शिकवू शकतो. BCCI ने मला त्यासाठी बोलवावे’
- मात्र, याबाबत वाद वाढताच कनेरियाने आपण असे काही बोलले नसल्याचे सांगितले.
येथून करतोय कमाई-
- क्रिकेटमध्ये बंदी घातल्यानंतर कनेरिया आता शालेय मुलांना क्रिकेटरचे धडे देत आहे.
- तो अनेक टीव्ही शोज करत आहे, ज्यात तो स्पेशल गेस्ट किंवा एक्सपर्ट म्हणून सामील होतो.
- याशिवाय तो काही सोशल इवेंट्समध्ये सहभाग घेतो.
- वसीम अक्रम, वकार यूनिस आणि इम्रान खाननंतर कनेरिया पाकिस्तानसाठी सर्वात जास्त विकेट घेणारा बॉलर आहे.
- तो, पाकिस्तानकडून टेस्टमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा स्पिनर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे फोटोजमधून पाहा, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अडकल्यानंतर लाईफटाईम बंदी घातलेल्या कनेरियाची कशी झाली अवस्था...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...