आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Former RCA President President Lalit Modi Family Facts In Marathi

मुलगा मुंबईत- मुलगी स्वित्झर्लंडमध्ये, मोदीने 9 वर्षे मोठ्या घटस्फोटीतसोबत केला विवाह

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
1. पत्नी मीनलसोबत ललित मोदी. 2. मुलगी आलिया. 3. सावत्र मुलगी करीमा आणि मुलगा रुचिर. - Divya Marathi
1. पत्नी मीनलसोबत ललित मोदी. 2. मुलगी आलिया. 3. सावत्र मुलगी करीमा आणि मुलगा रुचिर.
नवी दिल्ली - आयपीएलचे माजी आयुक्त आणि भ्रष्टाचारातील आरोपी ललित मोदी रोज नवीन ट्विट करुन चर्चेत राहात आहे. मंगळवारी रात्री त्यांनी तीन ट्विट करुन भाजप खासदार वरुण गांधींनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडून आयपीएल प्रकरण मिटवण्याचे आश्वासन दिले होते, त्यासाठी 380 कोटी रुपयांची मागणी केल्याचे ट्विट केले. त्याआधी चेन्नई सुपर किंग्जचे खेळाडू सुरेश रैना, रवींद्र जडेजा आणि ड्वेन ब्राव्हो सट्टेबाजीत सहभागी असल्याचे ट्विट केले होते. मात्र बीसीसीआयने हे आरोप फेटाळून लावले.
भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मोदींना राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मदत केल्याचाही आरोप होत आहे. यामुळे भाजपमधील या दोन्ही दिग्गज नेत्या अडचणीत आल्या आहेत. वेगवेगळ्या वादात अडकलेले मोदींचे कुटुंब देखील एखाद्या कोड्यासारखे आहे. त्यांची मुलगी आलिया स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेत आहे तर, मुलगा रुचिर मुंबईत आहे. divaymarathi.com ललित मोदी आणि त्यांच्या कुटुंबाबद्दल महत्त्वाची महिती येथे देत आहे.
शिक्षण घेत असताना मीनलवर जीव जडला
परदेशात शिक्षण घेत असताना ललित यांचा जीव आईची मैत्रिण मीनलवर जडला होता. मीनल ललित यांच्यापेक्षा 9 वर्षांनी मोठी होती, तरीही दोघांमध्ये जवळीक वाढली होती.
मीनलचा प्रथम नकार, नायझेरियाच्या उद्योगपतीसोबत केले लग्न
मीनलने नायझेरियाचा बिझनेसमॅन जॅक सागरानीसोबत लग्न केले. या लग्नाच्या काही दिवसांपूर्वी ललितने मीनलसमोर प्रेम व्यक्त करुन लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. त्यावर मीनल भडकली होती. तिने तब्बल चार वर्ष ललितसोबत बोलणे बंद केले होते.
...आणि अखेर एक झाले ललित-मीनल
मीनल आणि सागरानी फार दिवस एकत्र राहू शकले नाही. दोघांचा लवकरच घटस्फोट झाला. त्यानंतर ललित आणि मीनल पुन्हा जवळ आले. त्यांच्या या नात्याला ललित यांच्या कुटुंबीयांकडून प्रचंड विरोध झाला. परंतु, ललित यांनी माघार घेतली नाही. 17 ऑक्टोबर 1991 रोजी त्यांनी लग्न केले.
सावत्र मुलीला दिले नाव
मीनलला आधीच्या लग्नातून झालेली एक मुलगी होती. तिचे नाव करीमा. ललित यांनी तिला स्विकारले. तिचे लग्न गौरव बर्मन याच्यासोबत लावून दिले. डाबर ग्रुपचे मालक विवेक बर्मन आणि मोनिका बर्मन यांचा तो मुलगा आहे. गौरवचा भाऊ मोहित बर्मन किंग्ज इलेव्हन पंजाबचा कोओनर आहे.
मुलगा मुंबईत, मुलगी स्वित्झर्लंडमध्ये
ललित आणि मीनल यांना झालेल्या मुलाचे नाव रुचिर आहे. त्यांना आलिया नावाची मुलगीही आहे. ती स्वित्झर्लंडमध्ये पदवी घेत आहे. रुचिर मुंबईत 'अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे' येथे शिक्षण घेत आहे. तो विजय माल्या यांचा मुलगा सिद्धार्थचा चांगला मित्र आहे. आयपीएल पार्टीमध्येही तो बरेचदा दिसला आहे. मुलगी देखील आयपीएल सामने आणि पार्टीमध्ये दिसली आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, ललित मोदीचे कुटुंब...