आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथी अॅशेस कसोटी आजपासून रंगणार! अष्टपैलू शेन वॉटसनला पुनरागमनाची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाँटिंगहॅम - अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीनंतर संघाबाहेर करण्यात आलेला ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनला या सामन्यात पुनरागमनाची आशा आहे. आपल्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक असून कसोटी संघात पुनरागमनाची इच्छा वॉटसनने बोलून दाखवली. ट्रेंट ब्रिज येथे चौथ्या कसोटीत इंग्लंडविरुद्ध वॉटसनला संधी मिळू शकते.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या (सीए) अधिकृत संकेतस्थळावर वॉटसन म्हणाला, "मला अजूनही अॉस्ट्रेलियाकडून खेळण्याची इच्छा आहे. मला ज्या स्तरावर, ज्या सामन्यात संधी मिळेल, मी खेळत राहीन. मला माझे सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करायचे असून राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्याची इच्छा आहे. माझ्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक असल्याचे मला वाटते,' असेही तो म्हणाला. वॉटसनच्या जागी संघात सामील करण्यात आलेल्या मिशेल मार्शला विशेष कामगिरी करता आली नाही. मार्शने तिसऱ्या कसोटीत ० आणि ६ धावा काढल्या.
अॅशेस जिंकण्यासाठी खेळणार इंग्लंड
यजमान इंग्लंड संघ चौथी कसोटी जिंकून अॅशेस मालिकेवर ताबा मिळवण्याच्या लक्ष्याने मैदानावर उतरेल. इंग्लंडला मालिका जिंकण्यासाठी आणखी एका विजयाची गरज आहे. इंग्लंड मालिकेत २-१ ने पुढे आहे. इंग्लंडला या सामन्यात त्यांचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनची उणीव जाणवेल. तो जखमी असल्याने संघाबाहेर आहे.