आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Fourth Cricket Test In India Strong Position, 121 Runs On All Out Africa

टीम इंडिया मजबूत स्थितीत, द. आफ्रिकेला १२१ धावांत गुंडाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मधल्या फळीचा भरवशाचा फलंदाज अजिंक्य रहाणेच्या कसोटीतील पाचव्या शतकाच्या (१२७) बळावर आणि रवींद्र जडेजाच्या (३० धावांत ५ विकेट) घातक गोलंदाजीच्या जोरदार टीम इंडियाने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहेे. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. भारताने रहाणेचे शतक आणि अश्विनच्या अर्धशतकाच्या (५६) बळावर ३३४ धावांचा मजबूत स्कोअर उभा केला. यानंतर जडेजाच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर द. आफ्रिकेला पहिल्या डावात अवघ्या १२१ धावांत गुंडाळले. पाहुण्या द. आफ्रिकेवर फॉलोऑनची नामुष्की आली आहे. भारताला पहिल्या डावात तब्बल २१३ धावांची आघाडी मिळाली.
भारतीय टीम शनिवारी पाहुण्या आफ्रिकेला फॉलोऑन देईल की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. भारतीय संघ शनिवारी सकाळी दुसऱ्यांदा फलंदाजीस येऊ शकतो. शुक्रवारी डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने ३० धावांत ५ विकेट घेतल्या, तर ऑफस्पिनर आर. अश्विनने २६ धावांत २ आणि उमेश यादवने ३२ धावांत दोन गडी बाद केले. ईशांत शर्माने २८ धावांत एकाला बाद केले. पाहुण्या संघाकडून ए.बी. डिव्हिलर्सने सर्वाधिक ७८ चेंंडूंत ४ चौकारांसह ४२ धावा काढल्या.

अजिंक्य रहाणे- आर.अश्विनची
९८ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी
भारताने सकाळी ७ बाद २३१ वरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. रहाणे ८९ आणि अश्विन ६ धावांवर खेळत होते. द. आफ्रिकाने सकाळी नवा चेंडू घेतला. त्यांच्याकडून मोर्न मोर्कल आणि अॅबोट यांनी आक्रमणाला सुरुवात केली. मात्र, रहाणे-अश्विनने अत्यंत जबाबदारीने फलंदाजी करून आफ्रिकेचे प्रयत्न हाणून पाडले. रहाणेने अॅबोटला चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी कारकीर्दीतील पाचवे शतक ठरले. शतक पूर्ण केल्यानंतर रहाणेने अधिक आक्रमक फलंदाजी केली. त्याने ऑफस्पिनर डेन पिटला एका षटकांत लाँग ऑन आणि लाँग ऑफवर दोन षटकार मारले. इम्रान ताहीरच्या चेंडूवर मारण्याच्या नादात रहाणे बाद झाला. तत्पूर्वी रहाणेने ताहीरला षटकार खेचून आपले अर्धशतक पूर्ण केले. अश्विन दुसऱ्या सत्रात अॅबोटच्या चेंडूवर ५६ धावा काढून बाद झाला. अॅबोटने २४.५ षटकांत ४० धावांत ५ गडी बाद केले. ऑफस्पिनर डेन पिटने ११७ धावांतत ४ गडी केले.

दिल्लीतील शतक खास : रहाणे
दिल्लीतील शतक माझ्यासाठी खास आहे. भारतीय भूमीवर कसोटीतील हे माझे पहिले शतक ठरले आहे, अशी प्रतिक्रिया दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर भारताचा शतकीवीर अजिंक्य रहाणेने व्यक्त केली. रहाणे म्हणाला, "मी माझे कसोटी पदार्पण मार्च २०१३ मध्ये याच मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध केले. आता याच मैदानावर शतक झळकावणे हे माझ्यासाठी खास आहे. मी चुकीचा फटका खेळून बाद होत होतो. खेळपट्टी संयमाने खेळण्याची गरज होती. मी तेच केले आणि शतक झाले,' असे रहाणेने म्हटले.

०५ वे कसोटी शतक रहाणेने ठोकले
०५ विकेट रवींद्र जडेजानेे घेतल्या
०५ विकेट केली अॅबोटच्या नावे
५६ धावांची खेळी अश्विनने केली

आधीची चार शतके विदेशात
रहाणेचे हे कसोटीतील पाचवे शतक ठरले. यापूर्वीची चार शतके त्याने विदेशात ठोकली. यापूर्वी रहाणेने मेलबर्न येथे १४७, कोलंबोत १२६, वेलिंग्टन येथे ११८ आणि लॉर्ड््सवर १०३ धावा काढल्या होत्या. भारतात हे त्याचे पहिलेच शतक होते.

... ८३ धावांत ९ विकेट
भारताचा पहिला डाव ३३४ धावांवर संपुष्टात आला. चहापानाच्या ब्रेकपर्यंत द. आफ्रिकेने एक बाद ३८ धावा काढल्या होत्या. तिसऱ्या सत्रात आफ्रिकेने ८३ धावांत आपल्या उर्वरित ९ विकेट गमावल्या. आफ्रिकेचा १२१ धावांत खुर्दा उडाला.

कुंबळेची चिमुकल्यांसह सेल्फी
लंचनंतरच्या सत्रात अनिल कुंबळे इस्ट स्टंॅडवर बसलेल्या शाळकरी मुलांत पोहोचला. कुंबळेने या शाळकरी मुलांसोबत १५ ते २० मिनिटे घालवली. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष आदेशानंतर शाळकरी मुलांसाठी स्टेडियममध्ये खास बैठक व्यवस्था करण्यात आली. या वेळी कुंबळेने चिमुकल्यांसह सेल्फी घेतली. कुंबळेने यावेळी अॅटोग्राफही दिले.

धावफलक
(कालच्या ७ बाद २३१ पासून पुढे)
भारत पहिला डाव धावा चेंडू ४ ६
रहाणे झे. डिव्हिलर्स गो. ताहिर १२७ २१५ ११ ४
आर. अश्विन झे. डिव्हिलर्स गो. अॅबोट ५६ १४० ६ १
उमेश यादव नाबाद १० ३० २ ०
ईशांत शर्मा पायचीत गो. अॅबोट ०० ०२ ० ०
अवांतर : १२. एकूण : ११७.५ षटकांत सर्वबाद ३३४ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-३०, २-६२, ३-६६, ४-१३६, ५-१३८, ६-१३९, ७-१९८, ८-२९६, ९-३३४, १०-३३४. गोलंदाजी : मोर्केल २४-५-५८-०, अॅबोट २४.५-७-४०-४, पिडेट ३८-६-११७-४, ताहिर १६-२-६६-१, एल्गर ११-०-३३-०, डुमिनी ४-०-१२-०.
दक्षिण आफ्रिका धावा चेंडू ४ ६
एल्गर झे. शहा गो. यादव १७ ५० २ ०
बवुमा त्रि. गो. जडेजा २२ ५५ ३ ०
अमला झे. शहा झे. जडेजा ०३ ३४ ० ०
डिव्हिलर्स झे. इशंात गो. जडेजा ४२ ७८ ५ ०
डुप्लेसिस झे. रहाणे गो. जडेजा ०० ०२ ० ०
जे.पी. डुमिनी त्रि. गो. यादव ०१ ०८ ० ०
विलास त्रि. गो. ईशांत ११ २१ १ ०
अॅबोट पायचीत गो. अश्विन ०४ ०६ १ ०
पिडेट झे. रहाणे गो. जडेजा ०५ १८ ० ०
मोर्केल नाबाद ०९ १७ ० ०
ताहिर झे. सब-राहुल गो. अश्विन ०१ ०९ ० ०
अवांतर : ६. एकूण : ४९.३ षटकांत सर्वबाद १२१ धावा. गडी बाद होण्याचा क्रम : १-३६, २-४०, ३-५६, ४-६२, ५-६५, ६-७९, ७-८४, ८-१०३, ९-११८, १०-१२१. गोलंदाजी : ईशांत शर्मा १२-५-२८-१, उमेश यादव १२-३-३२-२, आर. अश्विन १३.३-५-२६-२, रवींद्र जडेजा १२-२-३०-५.
पुढील स्‍लाइडवर पाहा संबंधीत फोटो...
बातम्या आणखी आहेत...