आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा वनडे : टीम इंडिया आज तरी जिंकणार काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कॅनबरा - स्थानिक मनुका ओव्हल मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच वनडे सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना बुधवारी खेळवला जाईल. आयसीसी क्रमवारीतील आपले दुसरे स्थान वाचवण्याचे प्रयत्न टीम इंडियाचे असेल. भारताने मालिकेतील सुरुवातीचे तीन सामने गमावले असून या पराभवासह मालिकाही हातून गेली आहे. आता उर्वरित दोन सामने जिंकून अब्रू वाचवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलिया मालिकेत ३-० ने पुढे असून ५-० ने मालिका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या सामन्यात भारत आपल्या चुका दुरुस्त करून खेळण्याचा प्रयत्न करेल. धोनीने आपल्या गोलंदाजांना चांगलेच सुनावले अाहे. आता चांगली कामगिरी करण्याचे आव्हान ईशांत शर्मा आणि भारतीय गोलंदाजांसमोर आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीतील दुसरे स्थान कायम ठेवण्यासाठी भारताला किमान एकतरी वनडे जिंकणे आवश्यक आहे. यामुळे धोनी ब्रिगेड हा सामना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल, असे वाटते. विश्व चॅम्पियन ऑस्ट्रेलिया क्रमवारीत नंबर वन असून उर्वरित दोन्ही सामने गमावले तरीही ऑस्ट्रेलियाच्या क्रमवारीत बदल होणार नाही. मात्र, भारताने उर्वरित दोन्ही सामने गमावले तर टीम इंडिया तिसऱ्या स्थानावर घसरेल.
ऑस्ट्रेलियाच्या जमिनीवर गोलंदाजांनी निराश केले असले, तरीही फलंदाजांनी मात्र चांगले प्रदर्शन केले आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी आपली जबाबदारी पार पाडली आहे. रोहितने सुरुवातीच्या दोन वनडेत दोन शतके ठोकली. विराटने तीन सामन्यांत दोन अर्धशतके आणि एक शतक झळकावले. भारताकडून सर्वाधिक धावा काढण्यात रोहित ३०१ धावांसह पुढे आहे. विराट २६७ धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
चांगले प्रदर्शन करावे
आम्ही मालिका गमावली आहे, मात्र गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करावे, असे वाटते. आपल्या चुकांतून त्यांनी धडा घ्यावा, त्या दुरुस्त कराव्यात. जे तीन सामन्यांत झाले, त्यात सुधारणा हवी आहे. असे घडले तर मग निकाल काहीही असो.
- रवी शास्त्री.

पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून वाचा, भारताच्या सुमार प्रदर्शनाची कारणे....