आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेंच अाेपन: वाॅव'रिंका चॅम्पियन ! नाेवाक याेकाेविकला उपविजेतेपदाचा मान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅरिस - स्वित्झर्लंडचास्टॅन वावरिंका फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीचा चॅम्पियन ठरला. त्याने फायनलमध्ये जगातील नंबर वन नाेवाक याेकाेविकवर राेमहर्षक विजयाची नाेंद केली. वावरिंकाने ४-६, ६-४, ६-३, ६-४ अशा फरकाने सामना जिंकला. यासह त्याने टेनिसच्या करिअरमध्ये प्रथमच फ्रेंच अाेपनचे अजिंक्यपद अापल्या नावे केले. दुसरीकडे सर्बियाच्या नाेवाक याेकाेविकला तिसऱ्यांदा उपविजेेतेपदावर समाधान मानावे लागले. त्याने अजिंक्यपदासाठी दिलेेली झुंज सपशेल अयपशी ठरली.

सरस खेळी करताना अाठव्या मानांकित वावरिंकाने अंतिम सामना जिंकला. यासाठी त्याने अाक्रमक सर्व्हिस करून सामना अाणि उपस्थितांचीही मने जिंकली. अव्वल मानांकित याेकाेविकने अपेक्षेप्रमाणे सामन्यात दमदार सुरुवात केली. त्याने पहिल्या सेटमध्ये ६-४ ने बाजी मारून अाघाडी मिळवली हाेती. मात्र, त्याला ही अाघाडी दुसऱ्या सेटमध्ये कायम ठेवता अाली नाही. शानदार कमबॅक करताना स्विसच्या वावरिंकाने ६-४ ने बाजी मारून याेकाेविकला दुसऱ्या सेटमध्ये चाेख प्रत्युत्तर दिले. याशिवाय त्याने लढतीत बराेबरी साधली. त्यानंतर त्याने तिसऱ्या सेटमध्येही अापली अाक्रमक खेळीची लय कायम ठेवली अाणि पुन्हा मागे पाहता त्याने अागेकूच केली. त्याने तिसरा सेट जिंकून लढतीत अाघाडी मिळवली. त्यापाठाेपाठ त्याने चाैथ्या सेटमध्येही अापला दबदबा कायम ठेवला. त्यामुळे प्रचंड दबावात अालेल्या याेकाेविकने चुका केल्या. याचा फायदा घेत स्विसच्या वावरिंकाने चाैथा सेट जिंकून सामना अापल्या नावे केला.

प्रथमच फ्रेंच अाेपनचा किताब
माजी अाॅस्ट्रेलियन अाेपन चॅम्पियन वावरिंकाने प्रथमच फ्रेंच अाेपन टेनिस स्पर्धेचा किताब पटकावला. त्याने पहिल्यांदा अंतिम फेरीत धडक मारली हाेती. यासह त्याने फायनल जिंकली. यापूर्वी त्याने २००६ मध्ये या स्पर्धेची तिसरी फेरी गाठली हाेती. मात्र, त्यानंतर त्याला पुढच्या फेरीत अागेकूच करता अाली नाही.
दुसरे ग्रँडस्लॅम
वावरिंकानेटेनिस करिअरमधील दुसरे ग्रँडस्लॅम अापल्या नावे केले. त्याने रविवारी फ्रेंच अाेपनचा किताब पटकावला. यापूर्वी त्याने २०१४ मध्ये अाॅस्ट्रेलिन अाेपनमध्ये अजिंक्यपद मिळवले हाेते.
पुरुष दुहेरीच्या किताबावर असलेले बाॅब अाणि माइक या ब्रायन बंधूंचे वर्चस्व रविवारी संपुष्टात अाले. फ्रेेंच अाेपनमध्ये तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावण्याच्या प्रयत्नात असलेल्या ब्रायन बंधूंना उपविजेतपेदावर समाधान मानावे लागले. इवान डाेडिंग अाणि मार्सलाे मेलाेने पुरुष दुहेरीच्या अजिंक्यपदावर नाव काेेरले. या जाेडीने अंतिम सामन्यात ब्रायन बंधूंचा पराभव केला. इवान अाणि मार्सेलाेने ६-७, ७-६, ७-५ ने राेमहर्षक विजयाची नाेंद केली.
फ्रेंच अाेपनच्या उपविजेत्या लुसिया सफाराेवाने रविवारी महिला दुहेरीचा किताब पटकावला. यासह तिने फ्रेंच अाेपनचे अजिंक्यपद जिंकण्याचे स्वप्न साकारले. यासाठी तिला अापली सहकारी बेथानी माटेकची माेलाची साथ मिळाली. चेक गणराज्यची लुसिया सफाराेवा अाणि अमेरिकेची बेथानी माटेक महिला दुहेरीच्या चॅम्पियन ठरल्या. या जाेडीने अंतिम सामन्यात अाॅस्ट्रेलियाच्या कॅसी डेल्लाक्युअा अाणि याराेस्लावा श्वेदाेवाचा पराभव केला. सफाराेवा-बेथानीने ३-६, ६-४, ६-२ अशा फरकाने शानदार विजयाची नाेंद केली.