आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fresh Photos Of Pakistani Cricketer Ahmed Shehzad Marriage

Fresh Photos: लग्नातही असा रागात दिसला पाकिस्तानी क्रिकेटर शहजाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर- पाकिस्तानी क्रिकेटर अहमद शहजाद याचे 19 सप्टेंबर रोजी राजेशाही थाटात लग्न झाले. सुरवातीला या लग्नात फार गोपनीयता बाळगण्यात आली. त्यामुळे लग्नाचे फोटो लगेच समोर आले नाहीत. पण आता अनेक फोटो जाहीर झाले आहेत. त्यात अहमद शहजाद रागात दिसतो. सहसा क्रिकेटच्या मैदानावर रागात दिसणारे पाकिस्तानी खेळाडू लग्नातही तसेच दिसतात असे या निमित्ताने समोर आले. शाहिद आफ्रिदीसोबत त्याने लग्नमंडपात प्रवेश केला. तेव्हा तो आनंदी होता. पण त्यानंतर त्याचा मुड खराब झाला. त्यानंतर लग्नात तो अॅंग्री यंग मॅन असाच दिसत होता. आता त्याच्या रागाचे कारणही समोर आले आहे.
मीडियाला बघून भडकला शहजाद
लग्नमंडपात मीडियाच्या लोकांना बघून शहजाद चांगलाच भडकला. कॅमेरामन त्याचे वारंवार फोटो टिपत होते. शहजादने मीडियाच्या लोकांना दूर ठेवण्यास सांगितले होते. तशी ताकीदही हॉटेलच्या व्यवस्थापनाला दिली होती. पण तसे झाले नाही. त्यामुळे संपूर्ण लग्नात त्याचा चेहरा चांगलाच सुजला होता. चेहऱ्यावरचा राग स्पष्ट दिसत होता.
पत्नीचा हात पकडून घेऊन गेला
लग्नसमारंभ झाल्यानंतर शहजाद खराब मुडमध्येच हॉटेलमधून बाहेर पडला. त्याच्या पत्नीचे नाव सना आहे. तिचा हात धरुनच तो हॉटेलबाहेर आला. यावेळी तो वेगात चालत होता. सनाला लग्नाच्या पेहरावात वेगात चालणे शक्य नव्हते. अखेर तिने त्याला हे सांगितले. त्यानंतर तो जरा हळू चालत होता.
पुढील स्लाईडवर बघा, लग्नातही कसा रागात दिसला शहजाद....