आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधार महेंद्रसिंग धाेनीविरुद्ध ‘विराट’ नाराजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय क्रिकेट संघात आता नव्याने एका वेगळ्याच वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे कसाेटीचा कर्णधार विराट काेहली आणि वनडेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यात ‘विराट’ वादाच्या सामन्याला सुरुवात झाली. धाेनीने निम्मा संघ विरोध करीत असतानाच भारतीय संघाच्या फलंदाजीचा कणा म्हणून उदयास येत असलेल्या अजिंक्य रहाणेला वगळले आणि नवा वाद सुरू झाला आहे.

भारतीय संघ नव्या खेळाडूंच्या आधाराने उभा होत आहे. जडणघडणीच्या या प्रक्रियेतील अजिंक्य हा महत्त्वाचा खेळाडू आहे. अशा खेळाडूला वगळणे संयुक्तीक नव्हते, असेही संघातील खेळाडूंचे म्हणणे होते. संघाच्या फलंदाजीचा कणा असणार्‍या खेळाडूला वगळण्याचा धोनीच्या विचित्र निर्णयामुळे अजिंक्यचे मानसिक खच्चीकरण होणार आहे. याचाही विचार व्हायला हवा. संघाचे क्रिकेट संचालक रवी शास्त्री यांनीही याबाबतीत मौन पाळले असले तरीही नजिकच्या काळात त्यांच्याकडूनही या प्रकरणाबाबत ‘स्फोटक’ माहिती बाहेर पडेल, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.

सौरव गांगुली आणि बीसीसीआय अध्यक्ष दालमिया या जोडगोळीच्या नव्या ‘क्रिकेट व्हिजन’ मुळेही काही जण धास्तावले आहेत. आता नव्याने भारतीय संघामध्ये वादाला ताेंड फुटले आहे. त्याचा परिणाम आता आगामी श्रीलंकेविरुद्ध मालिकेवरही पडण्याची शक्यता आहे. याच वादामुळे सध्या संघात दुफळीत निर्माण झाल्याचेही चित्र सध्या जगजाहीर झाले आहे.

धाेनीने दिले हास्यास्पद कारण
इंग्लंड, ऑस्ट्रेलिया,आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणेने खंबीरपणे फलंदाजी केली. याच खेळीच्या बळावर त्याने स्वत:ला सिद्ध केले. त्यामुळे त्याच्याकडून आशा हाेत्या. रहाणेला वगळताना धोनीने, त्यांची संथ फलंदाजी हे हास्यास्पद कारण दिले. तो संथ खेळतो हा त्याचा आक्षेप होता. खरं तर त्याला रहाणे हा एकदिवसीय क्रिकेटच्या संघाच्या नेतृत्वासाठीचा स्पर्धक नको होता.

‘मिस कम्युनिकेशन’
कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली यालादेखील महेंद्रसिंग धोनीचा अजिंक्य रहाणेला वगळण्याचा निर्णय रूचला नाही. मात्र त्याने याबाबत मतप्रदर्शन व्यक्त करताना, ‘मिस कम्युनिकेशन’ हा शब्द वापरला.

निकालावर परिणाम
भारतीय टीममधील खेळाडूंनी अजिंक्य रहाणेला खेळू देण्यासाठी जाेरदार पांंठिबा दर्शवला हाेता. या सर्व खेळाडूंच्या मते संघ हितासाठी अजिंक्यला वगळणे योग्य नव्हते. अजिंक्यला वगळण्याच्या कृतीचा सामन्याच्या निकालावर परिणाम झाला.त्यामुळेच टीम इंडियाला सलग दाेन पराभवासह वनडे मालिका गमावावी लागली.
बातम्या आणखी आहेत...