स्पोर्ट्स डेस्क - चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारताने बांगलादेशचा 9 गडी राखून पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या फायनलमध्ये भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. या टुर्नामेंटमध्ये आधीच्या सामन्यात भारताने पाकला पराभवाची धूळ चारली होती, तसाच पराभव बांगलादेशचाही सेमीफायनलमध्ये भारताने केला आहे. या सामन्यानंतर क्रिकेट चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॉमेंट्स करून टिंगल चालवली आहे. एक युजर लिहितो, बांगलादेशविरुद्धचा सामना तर शर्माजींचा मुलगा आणि जावयानेच जिंकवून दिला. हा मेसेज रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी लिहिण्यात आला आहे.
पुढच्या स्लाइड्समध्ये वाचा भारत-बांगलादेश सामन्यानंतर सोशल मीडियावर आलेल्या फनी कॉमेंट्स...