आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Funny Social Media Comments After Pakistan Win Over England In 1st Semifinal

ENG ला हरवून फायनलमध्ये पोहचला PAK, सोशल मीडियावर आले असे कमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सेमीफायनलमध्ये पाकिस्तानने इंग्लंडला 8 विकेटने हरवत फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. या सामन्यात पाकिस्तानच्या विजयानंतर सोशल मीडियावर अनेक मजेशीर कमेंटस पाहण्यास मिळत आहेत. पाकिस्तानी फॅन्सबरोबरच  भारतीय क्रिकेट फॅन्सनी खुप सारे ट्विट्स करत पाकिस्तानची फिरकी घेतली आहे. एका क्रिकेट फॅनने कमेंट्स करताना म्हटले आहे की, यावेळी सारे पाकिस्तानी म्हणत आहेत की...सजन रेडियो बजईयो...बजईयो...बजईयो...जरा. कारण 4 जूनच्या सामन्यानंतर साऱ्या पाकिस्तानी नागरिकांनी आपले टीव्ही संच तोडुन टाकले आहेत. 

असा राहिला मॅचचा रोमांच...

- टॉस हरल्यानंतर पहिल्यादा बॅटिंग करताना इंग्लंडच्या टीमने 49.5 ओव्हरमध्ये सर्वबाद 211 रन केले. इंग्लंडच्या एकाही बॅट्समनने सिक्स देखील मारला नाही.
- इंग्लंडच्या वतीने जो रुट (46), जॉनी बेयरस्टॉ (43), बेन स्टोक्स (34) आणि इयॉन मोर्गन (33) यांनी सर्वात जास्त रन केले. बाकी 7 बॅट्समन केवळ 49 रन जोडू शकले. पाकिस्तानच्या वतीने हसन अलीने उत्कृष्ट बॉलिंग करताना 10 ओव्हरमध्ये 35 रन देत 3 विकेट्स घेतल्या.
- ट्राग्रेटचा पाठलाग करताना पाकिस्तानी टीमने 37.1 ओव्हरमध्ये 2 विकेट गमावत 215 रन बनवत मॅच जिंकली. पाकिस्तानच्या अजहर अलीने 76, फखर जमानने 57, बाबर आजमने 38 आणि मो. हफीजने 31* रन केले.
- सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करणाऱ्या हसन अली याला मॅन ऑफ द मॅच निवडण्यात आले.
बातम्या आणखी आहेत...