आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५६ कसोटी खेळल्यानंतर कोलकाता पदार्पणाची कसोटी वाटते : गंभीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीम इंडियात दोन वर्षांनी पुनरागमन करणारा सलामीवीर गौतम गंभीर आपल्या निवडीमुळे आनंदी असून पदार्पणाच्या खेळाडूसारख्या भावना त्याच्या झाल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्ध उर्वरित दोन कसोटीसाठी जखमी लोकेश राहुलच्या जागी गंभीरची निवड करण्यात आली.
गंभीरने अखेरची कसोटी ऑगस्ट २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळली होती. मात्र, आता झालेल्या दुलीप ट्रॉफीत त्याचे प्रदर्शन शानदार झाले. यामुळे त्याचे संघातील पुनरागमन शक्य झाले. दुलीप ट्रॉफीत त्याने चार अर्धशतके ठोकली. निवडीनंतर िट्वट करताना गंभीर म्हणाला, “माझ्यात आता एखाद्या नवोदित खेळाडूसारखा उत्साह आहे. खेळाचा अनुभव आणि नव्या खेळाडूसारखी भीती हे सर्व काही सध्या माझ्यात आहे. भावनांनी भरलेल्या मनाने मी ईडन गार्डनवर येत आहे.’
पाचकसोटी ईडनवर खेळला
गंभीरनेईडन गार्डनवर पाच कसोटी सामने खेळले असून यात ३१.६२ च्या सरासरीने २५३ धावा काढल्या. गंभीरने भारतासाठी ५६ कसोटी खेळत ४२.५८ च्या सरासरीने ४०४६ धावा काढल्या.

कोहलीची पसंत कोण?
कोलकाता कसोटीबाबत चर्चा सुरू झाली आहे. काहींच्या मते गंभीर प्लेइंग इलेव्हनमध्ये असेल तर काहींच्या मते त्याच्या जागी शिखर धवनला अंतिम अकरा खेळाडूंत संधी मिळेल. गंभीर आणि धवन दोघेही डावखुरे फलंदाज आहेत. दोघे दिल्लीकडून खेळतात. भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीसुद्धा दिल्लीचा आहे. विराट या दोघांतून कोणाला निवडतो हे पाहणे रोमांचक ठरेल.
बातम्या आणखी आहेत...