आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेंद्रसिंग धोनीच्या कामगिरीवर माजी कर्णधार सौरव गांगुली असमाधानी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता- टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये पुणे संघाकडून खेळतोय. धोनीच्या फलंदाजीची चमक पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. मात्र, अजून धोनीला हवी तशी लय मिळालेली नाही. सोशल मीडियावर धोनीच्या प्रदर्शनावर अनेकजण प्रश्नचिन्ह निर्माण करताना माजी कर्णधार सौरव गांगुलीनेसुद्धा धोनीची टी-२० मधील कामगिरी सर्वश्रेष्ठ नाही, असे म्हटले आहे. गांगुलीच्या या मतामुळे धोनीचे चाहते नाराज होण्याची शक्यता अाहे. गांगुलीने धोनीला वनडेचा चॅम्पियन खेळाडू म्हटले. मात्र, टी-२० मधील त्याच्या प्रतिभेवर गांगुलीने प्रश्नचिन्ह निर्माण केले आहेत. 

गांगुली म्हणाला, ‘धोनी टी-२० सर्वोत्तम खेळाडू आहे, हे मी खात्रीने म्हणू शकत नाही. तो वनडेचा चॅम्पियन खेळाडू आहे. मात्र, टी-२० मध्ये मागच्या दहा वर्षांत त्याने केवळ एक अर्धशतक ठोकले आहे. याला आपण सर्वश्रेष्ठ प्रदर्शन म्हणू शकत नाही.’ टी-२० मध्ये धोनीच्या प्रभावहीन प्रदर्शनानंतर गांगुलीने हे मत व्यक्त केले. धोनी वनडेचा सर्वोत्तम खेळाडू आहे, असेही तो म्हणाला.

 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...