आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

21 शॉर्टलिस्टमध्ये नव्हते कुंबळेचे नाव, गांगुलीमुळे शास्त्री होऊ शकले नाही कोच

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काेलकाता - भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये सध्या माजी कर्णधार साैरव गांगुली वरचढ हाेत असल्याचे चित्र अाहे. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अनिल कुंबळेच्या नियुक्तीसाठी त्याने सल्लागार समितीचे सचिन तेंडुलकर अाणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे मन वळवल्याची चर्चा अाहे. रवी शास्त्रींची टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागू नये यासाठी गांगुलीची धडपड हाेती. शास्त्रींच्या प्रशिक्षक नियुक्तीसाठी ताे पूर्णपणे अनुत्सुक हाेता. त्यामुळेच रवी शास्त्रींची वर्णी लागली नाही. बिग बाॅस ठरू पाहणाऱ्या गांगुलीमुळे शरद पवार लाॅबीनेही शांततेचा पवित्रा अंगीकारल्याचे दिसते.

याशिवाय अाता रवी शास्त्री यांना दुसऱ्यांदा संधी मिळू नये यासाठीच गांगुली प्रयत्नशील हाेता. त्याचे फलितही झाले. सर्वाेेच्च न्यायालयाच्या बीसीसीअायतील समितीने कुंबळेच्या नियुक्तीबाबत अापली प्रभावी भूमिका बजावली. बीसीसीआयची प्रतिमा व क्रिकेटमध्ये सुधारणा घडवून अाणण्याचे अादेशही न्यायालयाने दिले अाहेत. त्यामुळे अाता अनिल कुंबळेला न्यायालयाच्या अहवालानुसार काम करावे लागेल.

शास्त्रींना दुसरी संधी निश्चित होती
माजी कर्णधार साैरव गांगुलीने कुंबळेच्या नियुक्तीचा अट्टहास केला नसता तर रवी शास्त्रींना दुसरी संधी मिळण्याचे जवळजवळ निश्चित झाले हाेते. कारण त्यांनी १८ महिन्यांपर्यंत यशस्वी संचालक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाने कसाेटी क्रमवारीत नंबर वन, वनडे अाणि टी-२० मध्ये दुसरे स्थान गाठले. याशिवाय विश्वचषकातही त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीमने अव्वल कामगिरी केली. याशिवाय दरम्यानच्या अनेक विदेश दाैऱ्यांतील मालिकांमध्ये यश संपादन केले अाहे.

कुंबळे पहिल्या २१ मध्येही नव्हते : नवनियुक्त प्रशिक्षक अनिल कुंबळे हा बीसीसीअायच्या नियमावलींमध्ये बसणारा नव्हता. त्यामुळे प्रशिक्षकपदासाठी अालेल्या अर्जांच्या छाननीमध्ये त्याला पहिल्या २१ मध्येही स्थान मिळवता अाले नाही. मात्र, गांगुलीने दबाव टाकून त्याचे नाव यात समाविष्ट केले.
पुढील स्लाइडमध्ये,
अाता सुपर-५ चा दबदबा
साैरव-शास्त्रींमध्ये मतभेद
बातम्या आणखी आहेत...