आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Gautam Gambhir Felt Disappointed For Not Being Selected In Team India For NZ Series

पुन्हा डावलल्याने गंभीर नाराज, असे केले टि्वट, सपोर्ट करणा-या आल्या कमेंट्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- न्यूझीलंड विरूद्ध घरगुती कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची सोमवारी निवड करण्यात आली. या संघात सलामीवीर गौतम गंभीरला संधी मिळेल असे बोलले गेले मात्र तसे झाले नाही. दुलीप ट्रॉफीत सातत्याने चांगली कामगिरी केल्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष केल्याने तो नाराज झाला आहे. चांगल्या कामगिरीमुळे संघात स्थान मिळेल अशी त्याला आशा होती मात्र निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला नाही. गौती म्हणाला, मी खूपच दु:खी पण फाईट जरूर करेन...
- टीम सिलेक्शननंतर गौतम गंभीरने ट्वीट करून संघात स्थान न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली.
- त्याने ट्वीट केले की, ‘मी निराश आहे मात्र हारलो नाही. मला बाजूला केले असले तरी घाबरट नाही.’
- ‘धैर्य माझा सहकारी आहे तर धाडस माझी शान आहे त्यासाठी मी जरूर लढेन’
- आपल्याला माहित असेलच की, स्थानिक क्रिकेट IPL मध्ये गौतम गंभीर सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे.
- असे असूनही त्याला मुख्य भारतीय संघात स्थान मिळत नाही. तर, दुसरीकडे, सीनियर क्रिकेटर आशीष नेहराला टी- 20 वर्ल्ड कपसाठी संघात स्थान दिले होते.
- नेहराने 36 वर्षात पाच वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर संघात स्थान मिळवले होते. तर 34 वर्षाचा गंभीर 2 वर्षापासून कसोटी आणि वन डे संघातून बाहेर आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, सोशल मीडियात आलेल्या कमेंटस ज्याक फॅन्सनी गंभीरला केलेय सपोर्ट...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...