आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंभीरला संघात नियमित सदस्य बनण्याची संधी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत सलामीवीर लोकेश राहुल जखमी झाल्यामुळे गौतम गंभीरला कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली. यानंतर त्याला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली नाही. मात्र, शिखर धवनही जखमी झाल्याने त्याला तिसऱ्या कसोटीत संघात सामील करण्यात आले. गंभीरने तिसऱ्या कसोटीत २९ आणि ५० धावांची खेळी केली. त्याच्याकडे कसोटी संघात नियमित सदस्य बनण्याची संधी आहे.
शिखर धवनची दुखापत आणि फॉर्म :
भारतीय कर्णधार कोहलीने तिसऱ्या कसोटी आधीच मीडियात स्पष्ट केले होते की गंभीर खेळणार आहे. धवन पहिल्या कसोटीत खेळला नाही. मात्र, दुसऱ्या कसोटीत तो जखमी झाला. शिखर धवन सलग अपयशी ठरत असताना जखमीसुद्धा झाला. श्रीलंकेतसुद्धा तो २ कसोटीत खेळला नाही.
विजयच्या कामगिरीत सातत्य नाही : न्यूझीलंडविरुद्ध मालिकेतही विजयने केवळ एक अर्धशतक ठोकले. उर्वरित चार डावांत त्याला केवळ ४५ धावा काढता आल्या. अशात गंभीर आणि राहुलकडे सलामीची जबाबदारी सोपवली जाऊ शकते.
कोचिंग स्टाफला गंभीरवर विश्वास :
गंभीरच्या पुनरागमनात कोच अनिल कुंबळेचे महत्त्वाचे योगदान होते. गंभीरच्या पुनरागमनामुळे अापण खुश असल्याचे कुंबळे यांनी मान्य केले. फलंदाजी कोच संजय बांगर यांनीसुद्धा गंभीरची स्तुती केली.
मोठ्या स्तरावर खेळण्याचा अनुभव
मागच्या ४, ५ वर्षांत भारतीय कसोटी संघात बरेच युवा आहेत. गंभीरचे करिअर १२ वर्षांचे आहे. गंभीरने ५७ कसोटींत ४२ च्या सरासरीने ४ हजारांपेक्षा अधिक धावा काढल्या. यात ९ शतके, २२ अर्धशतके झळकावली. गंभीरने अनेकवेळा अडचणीच्या वेळी चांगली कामगिरी केली. गंभीरचा अनुभव भारतासाठी कामी येऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...