आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौतम गंभीरची अखेर दोन वर्षानंतर कसोटी संघात निवड, इशांतऐवजी जयंत यादव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतासाठी 56 कसोटी खेळलेला गौतम गंभीर दोन वर्षानंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे. तो ऑगस्ट 2014 साली इंग्लंडविरूद्धची शेवटची कसोटी खेळला होता. - Divya Marathi
भारतासाठी 56 कसोटी खेळलेला गौतम गंभीर दोन वर्षानंतर भारतीय कसोटी संघात परतला आहे. तो ऑगस्ट 2014 साली इंग्लंडविरूद्धची शेवटची कसोटी खेळला होता.
कोलकाता- टीम इंडियाचा युवा सलामीवीर के. एल. राहुल याचे स्नायू दुखावले असून तो जखमी असल्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या उर्वरित दोन कसोटीतून आऊट झाला आहे. त्याच्या जागी भारताचा अनुभवी डावखुरा सलामीवीर गौतम गंभीरची भारतीय संघात निवड झाली आहे. वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याच्याऐवजी ऑफस्पिनर जयंत यादव याला संधी दिली आहे. दुलीप ट्राफीतील कामगिरीने गंभीरला संधी-
- दुसरी कसोटी 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरदरम्यान कोलकात्यात तर तिसरी कसोटी 8 ते 12 ऑक्टोबर दरम्यान इंदूरमध्ये खेळला जाईल.
- सय्यद मुश्ताक अलीचे शहर असलेल्या इंदूरमध्ये प्रथमच कसोटी सामना होत आहे.
- गंभीर सध्या भन्नाट फॉर्मात असून नुकत्याच झालेल्या दुलीप ट्रॉफीत त्याने इंडिया ब्ल्यू संघाचे नेतृत्व करताना विजेतेपद पटकावले होते.
- तसेच त्याने चार डावात 80 च्या सरासरीने अडीचशेच्या आसपास धावा केल्या होत्या.
- दुसरीकडे, तीन वर्षांनंतर युवराज सिंगचेही वन डे संघात पुनरागमन होऊ शकते.
- आज युवराज सिंगची फिटनेस चाचणी होणार आहे. गंभीरची मंगळवारी फिटनेस चाचणी झाली होती.
जयंत यादवला प्रथमच संधी-
- दिल्लीत जन्मलेला 26 वर्षाचा ऑफ स्पिनर जयंत यादवला प्रथम भारतीय संघात स्थान मिळाले आहे.
- जयंतने रणजी ट्रॉफीत 2012-13 च्या सीजनमध्ये हरियाणाकडून खेळताना एक रिकॉर्ड केला होता.
- त्याने अमित मिश्रासमवेत खेळताना आठव्या विकेटसाठी 392 धावांची भागीदारी केली होती. जयंतने 211 धावा केल्या होत्या.
- या विक्रमानंतर जयंतने IPL लिलावात सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. मात्र, टीम इंडियात सिलेक्शन झाले नव्हते.
- नुकत्याच झालेल्या इंडिया- ए टीमकडून ऑस्ट्रेलिया दौ-यात त्याने सात विकेट घेतल्या होत्या. तर, 2014-15 तील रणजी सीजनमध्ये 33 विकेट घेतल्या होत्या.

युवराजचे वनडे संघात पुनरागमन?
- भारताकडून 2013 मध्ये अखेरचा एकदिवसीय सामना खेळणारा डावखुरा फलंदाज युवराज सिंगची न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड होऊ शकते.
- आज बंगळुरात त्याची फिटनेस चाचणी होणार आहे. यात युवी पास झाला, तर त्याची वनडे संघात निवड होईल, असे संकेत आहेत.
- युवराज आणि गौतम गंभीर दोघे संघात असावेत, असे कुंबळेला वाटते.
पुढे स्लाईडद्वारे वाचा, भारतीय क्रिकेट संबंधित इतर घडामोडी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...