आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gayle Girlfriend Natasha Berridge Blessed With A Baby Girl

ख्रिस गेलच्या गर्लफ्रेंडला कन्यारत्न, IPL सोडून गेला होता जमैकाला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवारी गेलने पिता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर शेअर केले. - Divya Marathi
गुरुवारी गेलने पिता झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर शेअर केले.
बंगळुरु - ख्रिस गेल एका मुलीचा कन्य पिता झाला आहे. त्याची गर्लफ्रेंड नताशाने गुरुवारी मुलीला जन्म दिला. दोन दिवसांपूर्वीच गेल आयपीएल अर्ध्यात सोडून जमैकाला परतला होता. त्याने घरी परतल्यानंतर एक फोटो ट्विट केला आणि लिहिले, 'ऑन माय वे, बेबी.' गेलने मुलीचे नाव ब्लश ठेवले आहे.

सोशल मीडियावर सांगितले...
- पिता झाल्यानंतर गेलने ही माहिती सोशल मीडियावर शेअर केली, त्याने इंस्टाग्रामवर नताशासोबतचा फोटो शेअर केला.
- त्यासोबत लिहिले, 'आम्ही आमच्या सुंदर मुलीचे - ब्लशचे स्वागत करतो. दोन तासांपूर्वीच ती या जगात आली आहे. थँक गॉड.'
- 'एवढे सुंदर गिफ्ट आणि असा अनुभव जो प्रत्येकाला हवाहवासा असतो. त्यासाठी नताशाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.'
- याआधी गेलने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला होता, त्यात तो हॉस्पिटलमध्ये मास्क लावून बसलेला होता.
त्या फोटोसोबत लिहिले होते, "#CurrentSituation - Got milk?"
आयपीएल खेळण्यासाठी परत येणार
- ख्रिस गेल जमैकाला गेल्यामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही.
- आरसीबीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल 22 एप्रिल रोजी पुणे विरुद्धचा सामनाही मिस करु शकतो.
- आशा आहे की तो 25 एप्रिलला टीमसोबत असेल.
- नताशा गेलसोबत आयपीएलसाठी 2012 मध्‍ये भारतात आली होती. तेव्‍हा ती काही IPL पार्टींमध्‍येही दिसली होती.
गेलची IPL-9 मधील कामगिरी....
- या सीजनच्‍या 2 सामन्‍यांमध्‍ये गेल फ्लॉप ठरला. तो आतापर्यंत 1 रन काढू शकला.
- पहिल्‍या मॅचमध्‍ये त्‍याने सनराइजर्स हैदराबाद विरोधात 1 रन काढला.
- दिल्ली डेयरडेव्‍हिल्सविरोधात त्‍याने भोपळाही फोडला नाही.
- त्‍याच्‍या या कामगिरीवर कर्णधार विराट म्‍हणाला की, ''गेलचा फाॅर्म ही चिंतेची बाब आहे.''
- ''पण मला विश्‍वास आहे की, संघाला गरज भासेल तेव्‍हा तो चांगली कामगिरी करेल.''
- त्‍याची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु एक विजय आणि एका पराभवानंतर पाॅईंट टेबल चौथ्या नंबरवर आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, इन्स्टाग्रामवर शेअर केलेला फोटो