आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीसीसीअायकडून अाता युवांच्या प्रतिभेला मिळणार चालना; यंदापासून मुलींच्या क्रिकेट स्पर्धा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अाैरंगाबाद- अायसीसीच्या वर्ल्डकप फायनलमध्ये प्रवेश करण्याची भारतीय महिला क्रिकेट टीमच्या खेळाडूंची कामगिरी एेतिहासिक ठरली. प्रतिभावंतांच्या याच कामगिरीमुळे अाता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे लक्ष वेधले. यातून बीसीसीअायने अाता महिलांच्या क्रिकेटला चालना देण्याचा निर्णय घेतला. यासाठी अाता देशभरात यंदापासून १६ वर्षांखालील महिलांच्या क्रिकेट स्पर्धा अायाेजनाला सुरुवात करण्यावर शिक्कामाेर्तब केला.  त्यामुळे पश्चिम झाेनच्या क्रिकेट स्पर्धांना पुढच्या महिन्यात १६ डिसेंबरपासून सुरुवात हाेणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.    

यंदापासून अायाेजनाला सुरुवात
प्रतिभावंत महिला क्रिकेटपटू घडवण्यासाठी अाता बीसीसीअायने खास माेहीम राबवण्याची तयारी दाखवली. यातूनच युवांच्या प्रतिभेला चालना देण्याचा निर्णय घेण्यात अाला. यासाठी १६ वर्षांखालील मुलींच्या गटाचा विचार झाला. या युवा महिलांवर विशेष मेहनत घेतल्याच अागामी काळात बलाढ्य अाणि प्रतिभावंत राष्ट्रीय संघ तयार हाेईल, अशी याेजना अाहे. यासाठी १६ वर्षांखालील महिला क्रिकेट स्पर्धा अायाेजनावर शिक्कामाेर्तब झाले अाहे. त्यामुळे अाता डिसेंबरपासून देशभरात यंदापासून या स्पर्धा अायाेजनाला सुरुवात हाेईल. या स्पर्धेच्या अायाेजनासाठी बीसीसीअायने पुढाकार घेतला अाहे. 
 
निवड चाचणीतून संघ जाहीर
या स्पर्धेसाठी क्लब अाणि जिल्ह्यास्तरावर सर्वाेत्तम कामगिरी करणाऱ्या ४० युवा महिलांची निवड केली जाईल. या सर्वांना निवड चाचणीमध्ये सहभागी करण्यात येईल.  यातून दर्जेदार अाणि प्रतिभावंत अशा १८ खेळाडूंची टीम तयार करण्याचा निर्णय अाहे. यातून चांगला अाणि संतुलित असा संघ तयार हाेईल, असा विश्वास अायाेजकांना अाहे. 
 
 
 महिला क्रिकेटची प्रगती 
बीसीसीअायचा १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा अायाेजनाचा निर्णय हा महत्त्वपूर्ण अाहे. यामुळे देशभरात युवांच्या प्रतिभेला चालना मिळेल. त्यांना अापल्या कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी मिळेल. तसेच दर्जेदार कामगिरीमध्ये सातत्य ठेवता येईल. त्यामुळे  हा निर्णय युवांसाठी फायदेशीर ठरणारा असल्याची प्रतिक्रिया तज्ज्ञांकडून दिली जात अाहे.   
 
 पहिल्याच स्पर्धेत ३० संघ 
पहिल्या स्पर्धा अायाेजनाचीही तयारी  अंतिम टप्प्यात अाहे. यासाठी पाच झाेनमध्ये ही स्पर्धा  हाेईल. यामध्ये जवळपास ३० संघ सहभागी हाेण्याची शक्यता अाहे. पश्चिम झाेनमध्ये पाच युवा महिला संघांचा समावेश असेल.   
 
असे अाहेत झाेन
- पश्चिम विभाग : मुंबई, महाराष्ट्र, बडाेदा, गुजरात, साैराष्ट्र 
- मध्य विभाग : विदर्भ, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, रेल्वे. 
- पूर्व विभाग : बंगाल, त्रिपुरा, झारखंड, अासाम, अाेडिशा, एनसीसी. 
- दक्षिण विभाग : तामिळनाडू, कर्नाटक, हैदराबाद, केरळ, अांध्र प्रदेश, गाेवा. 
- उत्तर विभाग : दिल्ली, सर्व्हिस, पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश.
बातम्या आणखी आहेत...