आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ऑस्ट्रेलियाची T-20 ची सर्वोच्च धावसंख्या, 7 दिवसात श्रीलंकेचे 2 मोठे विश्वविक्रम तुटले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपला 35 वा सामना खेळणा-या ग्लेन मॅक्सवेल करिअरमध्ये प्रथमच सलामीला आला व विक्रमी शतक ठोकले. - Divya Marathi
आपला 35 वा सामना खेळणा-या ग्लेन मॅक्सवेल करिअरमध्ये प्रथमच सलामीला आला व विक्रमी शतक ठोकले.
पल्लेकल- ऑस्ट्रेलियाने मंगळवारी श्रीलंकेविरूद्ध टी-20 सामन्यात 20 षटकात 3 विकेट बाद 263 धावा केल्या. ही टी- 20 क्रिकेटमधील सर्वात मोठी धावसंख्या ठरली. मागील विक्रम 260/6 असा होता. श्रीलंकेने ही धावसंख्या 9 वर्षापूर्वी केनियाविरोधात बनवली होती. या विश्वविक्रमी धावसंख्येच्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने 65 चेंडूत 145 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया-श्रीलंका मॅचदरम्यान अनेक विक्रम बनले...
1# श्रीलंकेचा सर्वात मोठा पराभव-
264 धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ 20 षटकात 9 बाद 178 धावाच करू शकला. ऑस्ट्रेलियाने हा सामना 85 धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियाविरूद्ध श्रीलंकेची ही सर्वात मोठा हार आहे. याआधी ऑस्ट्रेलियानेच त्यांना 81 धावांनी हरविले होते.
2# एक वर्षात सर्वाधिक 12 पराभव-
श्रीलंकेचा या वर्षातील 15 मॅचपैकी 12 वा पराभव होता. एका वर्षात सर्वात जास्त वेळा हारण्याचा हा संयुक्त विक्रम लंकेच्या नावावर नोंदला गेला आहे. याआधी पाकिस्तान 2010 मध्ये इतकेच सामने हारला होता.
3# सात दिवसापूर्वी श्रीलंकेच्या नावावर होते वनडे, टेस्ट आणि टी 20 चे विश्वविक्रम, दोन तुटले, एक राहिला
- सात दिवसापूर्वी वनडे, टी 20 आणि कसोटी अशा तीनही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम श्रीलंकेच्या नावावर होते. मात्र, आता फक्त कसोटीत 952/6 धावांचा रिकॉर्ड राहिला आहे.
- इंग्लंडने 30 ऑगस्ट रोजी पाकिस्तानविरूद्ध 444/3 धावा काढून श्रीलंकेचा 443 धावांचा विक्रम मोडला होता. तर आता टी- 20 मध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेच्या विरोधात हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.
4# पहिल्यादाच सलामीवीराने पहिल्याच सामन्यात ठोकले शतक-
आपला 35 वा मॅच खेळत असलेला ग्लेन मॅक्सवेलने कॅरिअरमध्ये पहिल्यांदाच सलामीला खेळला. त्याने 65 बॉलमध्ये 145 धावा केल्या. यासोबतच तो एक सलामीवीर म्हणून पहिल्याच टी- 20 मॅचमध्ये शतक ठोकणारा पहिला क्रिकेटर बनला.
5# मॅक्सवेलने ठोकली सर्वोच्च वैयक्तिक दुसरी धावसंख्या-
- ग्लेन मॅक्सवेलची 145 ही धावसंख्या वैयक्तिकमध्ये दुस-या क्रमांकावर आली. त्याचाच सहकारी अॅरोन फिंच (156) त्याच्यापुढे आहे.
- मॅक्सवेलने 65 चेंडूत 145 धावा करताना 14 चौकार आणि 9 षटकार ठोकले.
- उस्मानने 22 बॉलमध्ये 36 धावा केल्या.
- कर्णधार डेविड वॉर्नरने 12 बॉलमध्ये 28 धावा केल्या.
6# श्रीलंकेवर सहा वर्षांनी पहिला विजय-
ऑस्ट्रेलियाचा श्रीलंकेवर सहा वर्षानंतर पहिला विजय आहे. दोन्ही संघ 9 वेळा भिडले होते. यात तीन ऑस्ट्रेलियाने तर सहा मॅचेस श्रीलंकेने जिंकले आहेत.
पुढे स्लाईडद्वारे फोटोजमधून पाहा, या सामन्यातील क्षणचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...