आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त 15 हजारांत गोपीचंदच्या बॅडमिंटन अॅकेडमीत ट्रेनिंग घेऊ शकता तुम्ही, वाचा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या अॅकेडमीत एका निवांत क्षणी पी. गोपीचंद.... - Divya Marathi
आपल्या अॅकेडमीत एका निवांत क्षणी पी. गोपीचंद....
नवी दिल्ली- रिओ ऑलिंपिकमध्ये रौप्यपदक विजेती भारतीय शटलर पी. व्ही. सिंधू हिची जेवढी चर्चा सुरु आहे त्यापेक्षा जास्त चर्चेत आहे तिचा कोच पी. गोपीचंद. गोपीचंद हाच तो प्रशिक्षक आहे ज्याने सिंधूला घडवले नव्हे तर लहानपणीच तिच्यातील गुणवत्ता हेरली. लंडनमध्ये सायना नेहवालने मेडलचा कारनामा केला होता. आता सिंधूने केला. सायना, सिंधूसोबतही श्रीकांत किदंबी या हि-यालाही पैलू पाडण्याचे काम गोपीने केले आहे. पी. कश्यप, गुरुसाई दत्त, अरूण विष्णू यासारखे आंतरराष्ट्रीय खेळाडूही गोपीनेच पुढे आणले.
आंध्र प्रदेश सरकारने पी.व्ही. सिंधूला 3 कोटी रूपये देताना तिचे कोच गोपीचंद यालाही 50 लाख रूपये दिले आहेत. यासोबतच त्याच्या अॅकेडमीला आणखी पाच एकर जमीन देण्याची घोषणा आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आज केली आहे.
गोपीचंदने 2003 साली हैदराबादमध्ये बॅडमिंटन अॅकेडमी सुरु केली. ही अॅकेडमी सुरु करताना त्याला खूप अडचणी आल्या. आंध्र सरकारने जमीन तर दिली होती पण पैसे कोठून उभे करायचे असा प्रश्न गोपीचंदला पडला होता. अखेर अनेक अडचणींवर मात करीत व स्वत:चे घर गहाण ठेऊन गोपीचंदने आपले स्वप्न पूर्ण केले. गोपीचंदच्या अॅकेडमीत मासिक 2 ते 15 हजार भरले की तुम्हाला तेथे ट्रेनिंग मिळू शकते. जर तुम्ही इच्छूक असाल या अॅकेडमीबाबत पुढे आणखी माहिती वाचू शकता....
पुढे स्लाईडद्वारे अधिक माहिती वाचा, गोपीचंदच्या अॅकेडमीबाबत...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...