आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्णधारपद सोडून दे, ग्रॅमी स्मिथचा डिव्हिलर्सला सल्ला !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जोहान्सबर्ग- द. आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने आताचा कर्णधार ए. बी. डिव्हिलर्सला वनडेचे कर्णधारपद सोडण्याचा सल्ला  दिला आहे. डिव्हिलर्सने सर्व लक्ष आपल्या फलंदाजीवर केंद्रित केले पाहिजे आणि कर्णधारपदाचा राजीनामा दिला पाहिजे, असे स्मिथला वाटते.   

याबाबत स्मिथ म्हणाला, “डिव्हिलर्सला आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. हे त्याच्या करिअरसाठी अत्यंत आवश्यक आहे. डिव्हिलर्सने द. आफ्रिकेसाठी बरेच काही केले आहे. आता २०१९ च्या विश्वचषकाला अवघी २ वर्षे शिल्लक असताना तो फिट राहणे फार आवश्यक आहे.’  

डिव्हिलर्सला आता कोणालाच काहीच सिद्ध करण्याची गरज नाही. तो एक स्टार खेळाडू आहे. त्याने आफ्रिकेसाठी खूप काही केले आहे. त्याला कोणाचा विचार करण्याची गरज नाही, असे स्मिथने म्हटले.
बातम्या आणखी आहेत...