आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Grandfather Of Gayle Had Played Club Cricket And Passion Passed To The Young Chris Gayle.

आई चिप्स विकून कमवायी पैसे, आज स्टार क्रिकेटर आहे पोलिसाचा हा मुलागा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज आणि माजी कर्णधार क्रिस गेल आज गुरूवारी (21 सप्टेंबर) ला आपला 39वा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल कॅरेबियन देशात जमैकाच्या किंगस्टनचे येथील रहिवाशी आहे. टी-20 क्रिकेट प्रकारात गेलला सर्वोत्कृष्ट फलंदाजाच्या रूपात ओळखले जाते. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात गेलच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. क्रिस गेल एक सामान्य कुटुंबातून आलेला आहे. त्याचे लहानपण अतिशय अडचणीत गेले.

आई विकायची चिप्स...
- क्रिस गेल लहान होता तेव्हा त्याचे वडिल डुडली गेल पोलिसांत होते, तर आई चिप्स विकून पैसे कमवत होती. क्रिसगेल सह घरात एकून सहा भावंडे होते, यात क्रिस पाचव्या नंबरचा होता.
- गेलच्या घरची परिस्थिती एकदम हालाकीची नव्हती. परंतु, घरात सहा मुले असल्याने  त्यांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी आई चिप्स विकत होती.
- क्रिस गेलला क्रिकेट वारशात मिळाले आहे. गेलचे आजोबा क्लब लेवलचे क्रिकेटर राहिले होते. त्यांच्याकडूनच क्रिसने क्रिकेटचे धडे घेतले.
- क्रिस आता पार्टनर नताशा बेरिजेसोबत राहतात. या जोडप्याची एक मुलगी आहे. तीचे नाव ब्लिश आहे.
- गेलने आपल्या क्रिकेट करियरची सुरूवात जमैकाच्या प्रसिद्ध ल्युकास क्रिकेट क्लबपासून केली होती. एका मुलाखतीत क्रिस गेल म्हणाला होता, मी त्यावेळी ल्युकासमध्ये नसतो, तर माहित नाही कुठे असतो.

असे राहिले क्रिकेट करियर...
- क्रिस गेलने आपल्या वनडे करीयरची सरूवात 1999 मध्ये भारताच्या विरोधात झालेल्या समान्यात केली होती. तर टेस्ट करियरची सुरूवात 2000 मध्ये झिबांब्वेविरोधातील समान्यात केली.
- गेलने आपल्या टेस्ट करियरमधील 103 सामन्यात 7214 रन बनवले आहेत. यात त्याने 15 शतकही झळकावले आहेत. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी दोन ट्रिपल शतकही लावले आहेत.
- वनडे करियरमध्ये त्यांनी 270 सामाने खेळून 9258 रन बनवले आहेत. या फॉर्मॅटमध्ये 22 शतक केले आहेत. 215 हा गेलचा सर्वोत्कृष्ट स्कोअर आहे.
- टी-20 करियरमध्ये गेलने 52 मॅच खेळून 1577 रन केले आहेत. यात त्याने 2 शतके झळकावली आहेत.
- क्रिस गेलने टेस्ट करियरमध्ये 73 विकेट, वनडे करियरमध्ये 163 विकेट आणि टी-20 करियरमध्य़े 17 विकेट घेतल्या आहेत.
पुढील स्लाइडवर पाहा, क्रिस गेलच्या आयुष्यातील काही महत्वाचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...