आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

६६ वर्षांनी रणजी करंडकाच्या फायनलमध्ये गुजरातचा प्रवेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या (२९ धावांत ६ विकेट) घातक गोलंदाजीच्या बळावर गुजरातने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये झारखंडला चौथ्याच दिवशी १२३ धावांनी पराभूत केले. या विजयासह गुजरातने ६६ वर्षांनी रणजी करंडकाच्या फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरातने याआधी १९५०-५१ मध्ये अखेरीस रणजीचे फायनल खेळले होते. त्या वेळी होळकर संघाने फायनलमध्ये गुजरातला हरवले होते.
   
गुजरातने झारखंडसमोर विजयासाठी २३५ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात झारखंडचा ४१ षटकांत अवघ्या १११ धावांत खुर्दा उडाला. झारखंडकडून कौशलसिंगने सर्वाधिक २४ धावा काढल्या. गुजरातकडून जसप्रीत बुमराहने १४ षटकांत २९ धावांत ६ गडी बाद केले. 

मुंबईला विजयासाठी २५१ धावांची गरज
राजकोट- कर्णधार अभिनव मुकुंद (१२२) आणि बाबा अपराजित (१३८) यांच्या शतकाच्या बळावर तामिळनाडूने ६ बाद ३५६ धावांचा मोठा स्कोअर करून आपला डाव घोषित केला. तामिळनाडूने रणजी करंडकाच्या सेमीफायनलमध्ये चौथ्या दिवशी गतचॅम्पियन मुंबईपुढे विजयासाठी २५६ धावांचे लक्ष्य ठेवले. मुंबईने बिनबाद ५ धावा काढल्या. मुंबईला विजयासाठी गुरुवारी २५१ धावांची गरज आहे.
बातम्या आणखी आहेत...