आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फायनलमध्ये अाॅस्ट्रेलिया अ संघाचा पराभव, तिरंगी मालिका भारत अ संघाने जिंकली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नई - युवा खेळाडू उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली भारत अ संघाने शुक्रवारी तिरंगी मालिका जिंकली. यजमान भारताने अापल्या घरच्या मैदानावर फायनलमध्ये अाॅस्ट्रेलिया अ संघाचा पराभव केला. भारताने ४ गड्यांनी फायनलमध्ये विजय िमळवून मालिका अापल्या नावे केली. तीन बळी घेऊन भारताच्या विजयात माेलाची भूमिका बजावणारा गुरकिरत सिंग सामनावीर अाणि मयंक अग्रवाल मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
प्रथम फलंदाजी करताना अाॅस्ट्रेलिया अ संघाने ९ बाद २२६ धावा काढल्या हाेत्या. गुरकिरत सिंगच्या (८७) नाबाद अर्धशतकाच्या बळावर भारताने सहा गड्यांच्या माेबदल्यात २२९ धावा काढल्या. यासह भारताने ४३.३ षटकांत सामना जिंकला.

धावांचा पाठलाग करणाऱ्या भारत अ संघाला मयंक अग्रवाल (३२) अाणि उन्मुक्त चंद (२४) यांनी दमदार सुरुवात करून दिली. या जाेडीने संघाला अर्धशतकी भागीदारीची सलामी िदली. दरम्यान, चाेरटी धाव घेताना मयंक बाद झाला. त्यापाठाेपाठ उन्मुक्त चंद अाणि मनीष पांडेने (९) तंबू गाठला. करुण नायरही भाेपळा न फाेडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर केदारने २९ धावांची खेळी करून विजयाचा मार्ग सुकर केला.

गुरकिरतचा धमाका
गुरकिरत सिंगने शानदार खेळी करून भारताला विजय मिळवून दिला. त्याने ८५ चेंडूंचा सामना करताना सात चाैकार अाणि दाेन षटकारांच्या अाधारे नाबाद ८७ धावा काढल्या. याशिवाय त्याने ४३.३ षटकांत संघाचा विजय निश्चित केला.
कर्ण शर्माची धारदार गाेलंदाजी
भारताचा युवा खेळाडू कर्ण शर्माने अाॅस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध फायनलमध्ये धारदार गाेलंदाजी करताना तीन विकेट घेतल्या. याशिवाय त्याने यजमान संघाच्या विजयात माेलाची भूमिका बजावली. त्याने दहा षटकांत ३७ धावा देत तीन बळी घेतले. तसेच गुरकिरत सिंगने दाेन गडी बाद केले. करुण नायर अाणि कुलकर्णीने प्रत्येकी एक विकेट घेतली.