आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका सामन्यात चंद्रपॉल पिता-पुत्राची अर्धशतके, वेस्ट इंडीजमधील प्रथम श्रेणीच्या सामन्यातील कामगिरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंगस्टन (जमैका)- अनेक पिता, पुत्रांनी क्रिकेटची मैदाने गाजवली. मात्र, एकाच वेळी, एकाच सामन्यात पिता पुत्रांनी अर्धशतके ठोकण्याची घटना क्वचितच घडते. वेस्ट इंडीजचा महान फलंदाज शिवनारायण चंद्रपॉल आणि त्याचा २० वर्षीय मुलगा तागेनारायण चंद्रपॉल या दोघांनी स्थानिक क्रिकेट सामन्यात एकाच संघाकडून खेळताना अर्धशतके ठोकण्याची कामगिरी केली.   

वेस्ट इंडीजमधील प्रथम श्रेणीच्या सामन्यात चंद्रपॉल पिता-पुत्रांनी ही कामगिरी केली.  जमैका वि. गुयाना यांच्यात किंगस्टनच्या सबिना पार्क मैदानावर चारदिवसीय सामना सुरू आहे. यात जमैकाविरुद्ध गुयानाकडून खेळताना शिवनारायण चंद्रपॉल आणि तागेनारायण चंद्रपॉल यांनी अर्धशतके ठोकली. जमैकाने प्रथम फलंदाजी करताना सर्वबाद २५५ धावा काढल्या. यानंतर गुयानाकडून तागेनारायण सलामीला खेळण्यास अाला. त्याने १३५ चेंडूंचा सामना करताना १ षटकार आणि ५ चौकारांसह ५८ धावा काढल्या. दुसरा सलामीवीर हेटमेयरनेही अर्धशतक ठोकताना ७४ धावा काढल्या. मधल्या फळीत लिओन जॉन्सन आणि विशाल सिंग अनुक्रमे १ आणि ५ धावा काढून बाद झाले. 

विशालसिंग १२८ च्या स्कोअरवर बाद झाला. यानंतर पाचव्या क्रमांकावर शिवनारायण चंद्रपॉल खेळण्यास आला. शिवनारायणने आपला  मुलगा तागेनारायणसोबत चौथ्या विकेटसाठी ३८ धावांची भागीदारी केली. तागेनारायाण अर्धशतक काढून बाद झाला. शिवनारायण चंद्रपॉलनेही अर्धशतकी खेळी केली. त्याने १७५ चेंडूंचा सामना करताना ४ चौकारांसह ५७ धावा काढल्या. शिवनारायण चंद्रपॉलने तळाच्या फलंदाजांसोबत कसेबसे गुयानाला २०० चा टप्पा गाठून दिला. गुयानाचा डाव २६२ धावांत आटोपला. 

२० वर्षांचा आहे तागेनारायण
२० वर्षीय तागेनारायण शिवनारायण चंद्रपॉलचा मुलगा असून, तो  प्रथम श्रेणीत गुयाना संघाकडून खेळतो. त्याने आतापर्यंत १५ प्रथम श्रेणी सामन्यांत २४.०६ च्या सरासरीने ६९८ धावा काढल्या आहेत. यात २ अर्धशतके ठोकली. ८१ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली आहे. तागेनारायण कामचलाऊ लेगब्रेक गोलंदाजही आहे.
बातम्या आणखी आहेत...