आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Harabhajan Singh Meet To Navjot Singh Sidhu In Apollo Hospital

सिद्धूला भेटायला रुग्णालयात पोहोचले स्टार्स, भज्जी म्हणाला- \'गेट वेल सून पंजाबी शेर\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवजोतसिंग सिद्धू यांना रुग्णालयात भटण्यासाठी पोहोचला क्रिकेटर हरभजनसिंग, सोबत काढला सेल्फी. - Divya Marathi
नवजोतसिंग सिद्धू यांना रुग्णालयात भटण्यासाठी पोहोचला क्रिकेटर हरभजनसिंग, सोबत काढला सेल्फी.
नवी दिल्ली- माजी क्रिकेटर आणि बीजेपीचे खासदार नवजोतसिंग सिद्धू सध्या दिल्लीच्या अपोलो रुग्णालयात अॅडमिट आहेत. ते सध्या डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस (deep vein thrombosis-DVT) या गंभीर आजाराशी झुंजत आहेत. अनेक प्रसिध्या आजी-माजी क्रिकेटर्ससह विविध क्षेत्रातील नामवंत लोक त्याच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी येथे येत आहेत. शुक्रवारी क्रिकेटर हरभजनसिंगने सिद्धू यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली. याचा फोटोही त्याने फेसबुक पेजवर शेअर करत, सिद्धू यांच्यासाठी लवकरच फिट होण्याची प्रार्थना केली. तो 11 ऑक्टोबरला सिद्धू यांना भेटण्यासाठी गेला होता. सिद्धू यांना भेटणार्‍यांध्ये माता वैष्णो देवी धाम येथे सर्वात पहिले आरती करणार्‍या पिंटूजीसह टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव, अझहरुद्दीनदेखील सामील आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांनी देखील सिद्धूच्या ट्वीटला रीट्वीट करून लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. पीएम यांनी सिद्धू यांना फायटर म्हटले होते.
'जीवन फार नाजुक आहे त्याची खूप काळजी घ्या'
तब्येतीत सुधारणा झाल्यानंतर सिद्धू यांनी स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून तब्येतीची माहिती दिली. त्यांनी लिहीले होते की, 'आजारी आहे पण नॉटआउट आहे. देवाच्या कृपेने या गंभीर आजारातून (DVT) चांगल्या प्रकारे बरा होत आहे. जीवन फार नाजुक आहे त्याची खूप काळजी घ्या.’
काय आहे डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस
सिद्धूला डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस (deep vein thrombosis -DVT) हा आजार झाला आहे. या आजारामुळे पायाच्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्त जमा होते आणि यावर वेळेवर उपचार झाले नाही तर पायही कापावालागू शकतो. साधारणपणे हा आजार 60 बर्षांपेक्षा अधिक वय असणार्‍या व्यक्तींना होतो. मात्र अपवादात्मक परिस्थितीत हा कुणालाही होऊ शकतो. जेव्हा ब्लड क्लॉट ब्रेक होऊन रक्ताबरोबर शरिरात इतरत्र पसरते तेव्हा हा आजार अधिक गंभीर होतो. याला अॅम्बोलिस्म (Embolism) असे म्हटले जाते. अॅम्बोलिस्म बॉडीच्या इतर भागात जाऊन तो भागही डॅमेज होऊ शकतो.
कसा ओळखावा डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस?
डीप व्हेन थ्रॉम्बॉसिस नावाचा हा आजार पायाच्या खालील भागावर असलेल्या मोठ्या नसांवर हल्ला करतो.
- हा आजार झाल्यानंतर पायाला होणारा रक्त पुरवठा थांबतो.
- स्किनचा रंग बदलायला लागतो. म्हणजेच कलर लाल होऊ लागतो.
- पायात नेहमी दुखणे
- पाय सुजणे
- पायाला स्पर्ष केल्यास पाय गरम जानवणे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, कोण-कोण पोहोचले सिद्धूला भेटायला.