आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Harbhajan Singh And Geeta Basra Played Cricket In TV Show Comedy Nights With Kapil

भज्जीने उलगडले \'राज\' सांगितले असा पडलो गीताच्या प्रेमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
क्रिकेट खेळताना गीता आणि हरभजन (वर). खाली कॉमेडी शोचा होस्ट कपिल शर्मासह भज्जी आणि गीता. - Divya Marathi
क्रिकेट खेळताना गीता आणि हरभजन (वर). खाली कॉमेडी शोचा होस्ट कपिल शर्मासह भज्जी आणि गीता.
न्यू कपल क्रिकेटर हरभजनसिंग आणि पत्नी गीता बसरा नुकतेच एका टीव्ही शोमध्ये दिसून आले. शो ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’मध्ये गीता आणि हरभजनने केवळ पर्सनल लाइफ विषयीच्या गप्पा शेअर केल्या नाही तर ते क्रिकेटही खेळले. येथे भज्जीने गीताला बॉलिंग केली.
पाहताच भज्जी पडला होता गीताच्या प्रेमात
शोमध्ये हरभजनसिंगने सांगीतले की, कसा तो गीताला द ट्रेन सिनेमातील गाणे ‘वो अजनबी’मध्ये पाहूनच प्रेमात पडला. मात्र तेव्हा गीता, स्टार क्रिकेटर असूनही भज्जीला ओळखत नव्हती. तर, गीताने सांगीतले की ती क्रिकेटमध्ये इंट्रेस्टेड नव्हती, त्यामुळेच भज्जीला होकार देण्यासाठी तिला 10 महिने लागले.
गीतासाठी गायले गाणे
या शोमध्ये हरभजनसिंगने गीतासाठी गाणेही गायले. शोचा होस्ट कपिल शर्माच्या सांगण्यावर भज्जीने शाहरुख खानचे गाणे ‘तुम पास आए...’ (फिल्म- कुछ कुछ होता है) गायले. यावेळी विराट कोहली, सचिन तेंडुलकर, इशांत शर्मा, शिखर धवन यांचे डुप्लीकेटही उपस्थित होते. गीता आणि हरभजनसिंगचा विवाह 29 ऑक्टोबर 2015 रोजी झाला आहे आणि रिसेप्शन 1 नोव्हेंबरला दिल्ली येथे झाले होते.

पुढील स्लाइड्सवर पाह, या शोमध्ये मस्ती करतानाचे हरभजनसिंग आणि गीता बसराचे काही खास PHOTOS...