आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Harbhajan Singh And Geeta Basra\'s Wedding: Controversies You Need To Know

भज्जीच्या लग्नात ठेवण्यात आला होता हुक्का, शिख संघटनांनी केली कारवाईची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लग्नानंतर पत्नी गीता बसरासह हरभजनसिंग. - Divya Marathi
लग्नानंतर पत्नी गीता बसरासह हरभजनसिंग.
नवी दिल्ली- हरभजनसिंगच्या लग्नाला गेलेल्या पाहुण्यांसाठी 113 प्रकारचा हुक्का ठेवण्यात आला होता. याचा खुलासा झाल्यानंतर, आता वादाला तोंड फुटले आहे. या प्रकरणानंतर पंजाबमधील अनेक शिख संघटना हरभजनसिंगच्या विरोधात गेल्या आहेत. त्यांचे म्हणणे आहे की तंबाखू ऑफर करून भज्जीने धार्मिक नियम तोडून शिखांच्या भावना दुखावल्या आहेत. भज्जी-गीताचा 29 ऑक्टोबरला जालंधर येथे विवाह झाला.

हरभजनच्या विरोधात तक्रार
- मिळालेल्या माहितीनुसार, शिख संघटनांनी या संदर्भात शिरोमणी गुरुद्वारा प्रशासनाला (एसजीपीसी) पत्र लिहिले आहे.
- संघटनांनी जालंधर पोलिस कमिश्नरलादेखील पत्र लिहून कारवाईची मागणी केली आहे.
- शिख संघटनांनी आरोप केला आहे की, भज्जीने असे करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत.
- अकाली दलचे नेते जरनैलसिंग ग्रेवाल यांनीही भक्तांना गुरुद्वारामध्ये न जाऊ दिल्याचा आरोप करत हरभजनच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
काय म्हणणे आहे संघटनांचे
- शिख अॅक्शन कमिटीचे प्रवक्ता आरएस बग्गा म्हणाले की, एक शिख असूनही हरभजनने पाहुण्यांसाठी हुक्का ऑफर करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. शिख धर्मात तंबाखूचे सेवन करणे नियम बाह्य आहे.
- कमिटीचे म्हणणे आहे की, गुरुद्वाराच्या बाहेर भज्जीने बाउंसर्स तैनात करुनही नियम तोडला आहे.
- ऑल इंडिया शिख स्टूडेंट्स फेडरेशनचे चीफ करनैलसिंग यानी म्हटले आहे की, पंजाबमध्ये आधीच धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने विवाद सुरू आहे. हे पाहता, भज्जीने त्याचे लग्न साधेपणाने करायला हवे होते.
- ते म्हणाले, 'लग्नाच्या वेळी गुरुद्वारा सामान्य जनतेसाठी बंद करण्यात आला होता. या मुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. यासाठी हरभजनला माफी मागायला हवी.
बाउंसर्सने केली होती, मीडियाला धक्का बुक्की
या आधी हरभजनच्या लग्नाचे कव्हरेज घेण्यासाठी गेलेल्या पत्रकांशीही त्याच्या बाउंसर्सने बाचाबाची केली. यासंदर्भात चार बाउंसर्सला पोलिसांनी अटकही केली होती. मात्र, या घटनेची हरभजनने माफीही मागितली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, फोटोज...