आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंदूर पिचबाबत कमेंट करून फसला भज्जी, फॅन्ससह विराटनेही दिले उत्तर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पोर्ट्स डेस्क- काय इंदूरची विकेट स्पिन फ्रेंडली होती त्यामुळेच आर. अश्विनला इतक्या विकेट मिळाल्या? या प्रश्नाला कर्णधार विराट कोहलीने उत्तर दिले आहे. विकेट कशीही असली तरी तुम्हाला चांगली बॉलिंग करावीच लागते, असे विराटने सांगितले. विराटने असे सांगून मॅचमध्ये फक्त 13 विकेटच घेतल्या नाहीत तर आर. अश्विनचे कौतूककरून सीनियर क्रिकेटर हरभजन सिंगला उत्तर दिले आहे. आपल्याला माहित असेलच की, हरभजनने इंदूर पिचबाबत मॅचच्या आधीच एक टि्वट करत ही खेळपट्टी दोन दिवस जुनी वाटत असल्याचे म्हटले होते. काय म्हणाला होता हरभजन...
- मॅच सुरु होण्याआधी एक दिवस आधी हरभजन सिंगने इंदूर पिचबाबत काही प्रश्न उपस्थित करत ट्वीट केले होते.
- भज्जीने म्हटले होते की, ‘पिच मॅच सुरु होण्याआधीच दोन दिवस जुनी वाटत आहे. अजून तर एक चेंडूही फेकला नाही. मला वाटतेय ही कसोटी साडेतीन दिवसात संपेल.’
- त्यानंतर दोन दिवसानंतर भज्जीचे आणखी एक टि्वट आले की, ‘103 कसोटीपैकी मला अशी खेळपट्टी दोन कसोटीतच फक्त मिळाली. जर चार वर्षापूर्वी आम्हाला अशा खेळपट्ट्या मिळाल्या असत्या तर माझ्या आणि अनिल कुंबळेंच्या नावावर आणखी विकेट असत्या.’
विराटने दिले उत्तर-
- मॅच आणि मालिका जिंकल्यानंतर जेव्हा विराटला स्पिन पिचबाबत छेडले असता तो म्हणाला, ‘पिच कशीही असो चांगली बॉलिंग करावीच लागते.’
- ‘हे अवलंबून असते तुम्ही बॉलला किती वेळा आणि कसे फिरवता. खांद्याचा वापर कसा करता यावरही अवलंबून असते.'
- ‘हे तेच न्यूझीलंडचे बॉलर्स आहेत ज्यांनी आम्हाला टी 20 वर्ल्ड कपमध्ये हरवले होते. तेव्हा त्यांनी आमच्यावर वर्चस्व गाजवले होते.’
- ‘इंदूर पिचवर तेच किवी स्पिनर का विकेट घेऊ शकले नाहीत याबाबत कोणीचबोलत नाही.’
- आपल्याला माहित असेलच की, इंदूर कसोटीत आर. अश्विनने पहिल्या डावात 6 आणि दुस-या डावात 7 अशा एकून 13 विकेट घेतल्या होत्यातर तीन कसोटीच्या मालिकेत 27 विकेट टिपल्या.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, हरभजन सिंगने काय टि्वट केली आणि त्याला फॅन्सने काय उत्तर दिले...
बातम्या आणखी आहेत...