आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • Harbhajan Singh My Number 1 Enemy, Says Former Aussi Cricketer Ricky Ponting

भज्जीला मी खूप घाबरायचो, मला आताही त्याची भीतीदायक स्वप्ने पडतात- पाँटिंगची कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने रिकी पाँटिंगला सर्वात जास्त वेळा म्हणजे 10 वेळा बाद केले होते. यात तीनदा पाँटिंग शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता. - Divya Marathi
कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने रिकी पाँटिंगला सर्वात जास्त वेळा म्हणजे 10 वेळा बाद केले होते. यात तीनदा पाँटिंग शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
स्पोर्ट्स डेस्क- ऑस्ट्रेलियाचा आणि जगातील दिग्ग्ज फलंदाज रिकी पाँटिंगला आजही भारतीय स्पिनर हरभजन सिंहची भीती वाटते. पाँटिंगने त्याला आपला सर्वात मोठा शत्रू असे संबोधले. माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या म्हणण्यानुसार, ‘ त्याला आज ही हरभजन सिंग स्वप्नात येऊन घाबरवतो.’ पाँटिंग आताच असे का म्हणाला...
- रिकी पाँटिंगने एका इंटरव्यूमध्ये सांगितले की, ‘जेव्हा मी खेळत होतो तेव्हा तो माझा सर्वात मोठा शत्रू होता.’
- ‘भारताविरोधात खेळताना मला त्याची खूप भीती वाटायची. मला आज सुद्धा त्याची भीतीदायक स्वप्ने पडतात.’
- जगातील सर्वोत्तम लेगस्पिनर राहिलेल्या ऑस्ट्रेलियाच्या शेन वॉर्नला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर स्वप्नातही षटकार ठोकून भीती दाखवायचा अशी कबुली फार काळापूर्वी दिली होती.
- आता याच शेन वॉर्नचा कर्णधार राहिलेल्या रिकी पॉन्टिंगने कबुली दिली आहे, की भारतीय ऑफस्पिनर हरभजनसिंग त्याला आताही स्वप्नात भीती दाखवतो.
- पाँटिंग म्हणतो, ‘ भारताविरुद्ध खेळत असताना माझा एकमेव प्रतिस्पर्धी हरभजनसिंग असायचा. मला तो बाद करील अशी धास्ती असायची. अगदी आताही तो मला स्वप्नात भीती दाखवितो.’
- आपल्याला माहित असेलच की, कसोटी क्रिकेटमध्ये हरभजन सिंगने सर्वात जास्त वेळा म्हणजे 10 वेळा बाद केले होते. यात तीनदा पाँटिंग शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतला होता.
- कसोटीत भज्जीने आपली 300 वी विकेट रिकी पाँटिंगची घेतली होती.
- कसोटी करिअरमध्ये 51.85 ची सरासरी असणा-या पाँटिंगची भारताविरोधात सरासरी 22.30 इतकी कमी आहे.
- भारताविरोधात खेळताना तो सातत्याने हरभजन सिंगचा बळी ठरला. तो त्याची गोलंदाजी खेळताना बुचकळ्यात पडायचा.
विराटचे केले कौतूक-

- पाँटिंगने भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीचे कौतूक करताना त्याला‘सुपर टॅंलेंटेड’ म्हटले.
- बेस्ट कसोटी फलंदाजाबाबत विचारले असता तो म्हणाला, मला या काळातील अनेक खेळाडूना खेळताना पाहून आनंद होतो.
- मात्र, विराट कोहली आपल्या वयातील खेळाडूंपेक्षा खूपच सरस आणि पुढे गेला आहे. त्याचे वन डे करिअर आतापर्यंत जबरदस्त राहिले आहे.
- टॅलेंटसोबत त्याच्याकडे एक वेगळी ऊर्जा आणि एडिट्यूड सुद्धा आहे. तो फक्त सर्वोत्तम खेळण्यासाठीच येतो असे वाटते.
- पाँटिंगने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीवन स्मिथ आणि न्यूझीलँडच्या केन विलियम्सनचे कौतूक केले.
- पाँटिंगला आपल्या होम स्टेट टास्मानियाचा ब्रॅंड अॅम्बेसेडर बनवल्याच्या निमित्ताने घेतलेल्या मुलाखतीत तो बोलत होता.
पुढे स्लाईड्सद्वारे जाणून घ्या, भज्जीने कधी कधी कसोटीत रिकी पाँटिंगला केले बाद...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...