आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शोएब अख्तरने मला, युवराजला पटकून बदडले होते! वाचा भज्जीने केलेला खुलासा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताचा सर्वाधिक यशस्वी ऑफस्पिनर हरभजनसिंग क्रिकेटशिवाय इतर गोष्टींसाठीही चर्चेत असतो. अँड्रयू सायमंड्ससोबत मंकी गेट प्रकरण किंवा श्रीसंतने श्रीमुखात भडकावल्याचे प्रकरण सर्वांच्या लक्षात आहे. भज्जीने आता एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक माहिती सांगितली.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने त्याला बदडले होते हे अातापर्यंत कोणालाही माहिती नव्हते. भज्जीसह युवीलासुद्धा अख्तरने एका खोलीत पटकून बदडले होते.
हरभजन म्हणाला, ‘अख्तर आमच्यासोबत मिळूनमिळसून राहायचा. आम्ही नेहमी सोबत जेवायचो. एका सामन्यात त्याने मला त्याच्या चेंडूवर षटकार मारण्याचे आव्हान दिले. मी षटकार मारले. यानंतर त्याने पुढचे दोन चेंडू बाऊन्सर टाकले. आमच्या दोघांत खूप शिवीगाळ झाली. त्या वेळी अख्तरने खोलीत घुसून मला बदडण्याची धमकी दिली होती. मीसुद्धा पटकन उत्तर दिले, ‘ये, बघू कोण वरचढ ठरतो ते.’ मात्र, सत्य हे होते की तो खरोखर खोलीत बदडायला आला तर काय होईल, हा विचार करून मी घाबरलो होतो. अख्तर शक्तिशाली आहे. एकदा तर त्याने मला आणि युवीला खोलीत पटकून बदडले होते (हे प्रकरण केव्हाचे आहे हे भज्जीने सांगितले नाही). आम्ही दोघे मिळून त्याला रोखू शकलो नाही. त्याने युवीला उचलून आपटले तेव्हा मी जाम घाबरलो होतो. ही हाणामारी मौजमस्तीत झाली होती. २००३ च्या वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर पाक ड्रेसिंग रूमच्या बाहेर मी भांगडा केला होता,’ असेही भज्जीने म्हटले. याचाही गाैप्यस्फाेट त्याने केला.
लेहमनला म्हटले, तू प्रेग्नंट आहेस काय?
हरभजन म्हणाला की, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर डॅरेन लेहमन मला वारंवार डिवचत होता. स्लेजिंग करत होता. यानंतर मी त्याच्या सुटलेल्या पोटाकडे इशारा करून तू प्रेग्नंट आहेस काय, असे विचारले. लेहमनने ही गोष्ट शेन वॉर्नला सांगितली. हे ऐकून वॉर्नलाही हसू आले. मी नेहमी ऑस्ट्रेलियन खेळाडूंना कडक शब्दांत उत्तर दिले. नंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी माझ्यावर स्लेजिंग करणे बंद केले, असेही भज्जी म्हणाला.

Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.

बातम्या आणखी आहेत...